काँग्रेस व राजद यांची महाआघाडी फुटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 06:04 IST2021-10-23T06:03:53+5:302021-10-23T06:04:48+5:30
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व ४० जागांवर आमचे उमेदवार असतील, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनी केली आहे.

काँग्रेस व राजद यांची महाआघाडी फुटली
- एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारमध्ये दोन पोटनिवडणुकांच्या प्रचाराच्या काळातच राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस यांची महाआघाडी पूर्णपणे संपुष्टात आली आहे. हे दोन्ही पक्ष वेगळे झाले असून, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व ४० जागांवर आमचे उमेदवार असतील, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनी केली आहे.
महाआघाडी फुटण्यास राजदच जबाबदार असल्याचा आरोपही दास यांनी केला. ते म्हणाले की, ज्या दोन जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत, त्यापैकी कुशेश्वरस्थान हा आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे राजदने ती जागा सोडावी, अशी विनंती आम्ही केली. पण राजदने ती अमान्य केल्याने आणि दोन्ही जागांवर उमेदवार उभे केल्याने आम्हालाही तसाच निर्णय घ्यावा लागला.