लाच मागितल्याप्रकरणी ग्रामसेवक ाला अटक
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:23+5:302015-09-01T21:38:23+5:30
घोडेगाव (वार्ताहर) : पिंपळगावतर्फे घोडा (ता. आंबेगाव) येथील ग्रामसेवक गणेश हरिश्चंद्र थोरात (वय ३५) याला ठेकेदाराकडून बिल काढण्यासाठी चार हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घोडेगावमधील पंचायत समितीच्या आवारात आज रोजी अटक केली.

लाच मागितल्याप्रकरणी ग्रामसेवक ाला अटक
घ डेगाव (वार्ताहर) : पिंपळगावतर्फे घोडा (ता. आंबेगाव) येथील ग्रामसेवक गणेश हरिश्चंद्र थोरात (वय ३५) याला ठेकेदाराकडून बिल काढण्यासाठी चार हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घोडेगावमधील पंचायत समितीच्या आवारात आज रोजी अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी ठेकेदाराने ग्रामसेवक गणेश थोरात याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. गेले पंधरा दिवस ग्रामसेवकावर पाळत ठेवण्यात आली होती. त्यानुसार आज मोबाईल संभाषणाच्या आधारे त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कलम ७ नुसार कारवाई करण्यात आली. या कारवाईत उपअधीक्षक जगदीश सातव, पोलीस निरीक्षक बी. एल. राऊत, धनंजय पिंगळे यांनी भाग घेतला.