शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मोदी सरकार आता साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत?, 'या' देशांना बसणार झटका! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 20:40 IST

जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर निर्यात करतो.

नवी दिल्ली-

जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर निर्यात करतो. यातच आता देशातील साखरेच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीला थांबविण्याची योजना आखत असल्याची माहिती समोर आली आहे. रॉयटर्स या वृत्त संस्थेने याबाबतचं वृत्त दिलं असून देशांतर्गत साखरेच्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार आता गव्हानंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची शक्यता आहे. 

गेल्याच आठवड्यात मोदी सरकारनं देशांतर्गत गरज लक्षात घेत गहूच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यापाठोपाठ आता साखरेच्या निर्यातीवरही निर्बंध येण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सीझन काळात साखरेची निर्यात १० मिलियन टनवर मर्यादीत करण्याचाही पर्याय सरकार चाचपडून पाहात आहे. 

दरवर्षी होतेय साखरेच्या निर्यातीत वाढसरकारी आकडेवारीनुसार भारतानं सप्टेंबरला समाप्त होणाऱ्या चालू आर्थिक वर्षात १८ मेपर्यंत जवळपास ७५ लाख टन साखर निर्यात केली आहे. तर २०२०-२१ या आर्थिक वर्षात ७० लाख टन साखर निर्यात झाली होती. तर २०१७-१८ या आर्थिक वर्षात ६२ लाख टन साखर निर्यात करण्यात आली होती. त्यामुळे आकडेवारी पाहिली तर दरवर्षी निर्यातीत वाढ नोंदविण्यात आली आहे. 

भारताकडून साखर खरेदी करणाऱ्या देशांमध्ये इंडोनेशिया, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, यूएई, मलेशिया आणि आफ्रिकन देशांचा समावेश आहे. भारतानं जर साखर निर्यातीवर बंदी घातली तर या देशांना मोठा झटका बसणार आहे. साखर निर्मितीत देशात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये एकूण साखर निर्मितीपैकी ८० टक्के निर्मिती याच राज्यांमध्ये होते. याव्यतिरिक्त आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, ओदिशा, तामिळनाडू, बिहार, हरियाणा आणि पंजाब यांचाही समावेश आहे. 

दरम्यान, केंद्र सरकारकडून साखर निर्यातीच्या बंदी बाबतची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मंगळवारी साखर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. महत्वाची बाब म्हणजे साखर निर्यात करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये देखील घसरण पाहायला मिळाली आहे. रेणुका शुगर कंपनीचे शेअर्स ६.६६ टक्क्यांनी, बलरामपूर मिल्सचे ५ टक्के आणि धामपूर शुगरचे शेअर्स ५ टक्क्यांनी कोसळले आहेत. 

साखर निर्यात बंदीनं काय होणार?देशात हंगामाच्या सुरवातीला ८५ लाख टन साखर शिल्लक होती. चालू हंगामात ३५५ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. देशांतर्गत साखरेचा वापर २८० लाख टन  गृहीत धरल्या तर १६५ लाख टन साखर शिल्लक राहतं. नव्या हंगामातील साखर बाजारात येण्यास किमान ३ महिने लागतात. महिन्याला २०ते २२ लाख टन साखर देशात लागते. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीला तीन महिन्यांची म्हणजेच ६० ते ६५ लाख टन साखर शिल्लक असणे आवश्यक आहे.  त्यामुळे १६५ लाख टनांपैकी १०० टनच साखरेच्या निर्यातीला परवानगी द्यावी. यापेक्षा जास्त निर्यात केल्यास देशात साखरेची टंचाई निर्माण होऊ शकते. यामुळेच केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. येत्या काही दिवसांत याबाबतची घोषणा अपेक्षित आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने