शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

कृषी कायदे रद्द हणार नाहीत, अमित शाहांनी केले स्पष्ट; आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना बुधवारी लेखी प्रस्ताव देणार

By बाळकृष्ण परब | Published: December 08, 2020 11:36 PM

Farmer Protest : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्यात सुरू असलेली बैठक समाप्त झाली असून, आधीच्या बैठकांप्रमाणेच ही बैठकही कुठल्याही तोडग्याविना संपल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्यात सुरू असलेली बैठक समाप्त झाली असून, आधीच्या बैठकांप्रमाणेच ही बैठकही कुठल्याही तोडग्याविना संपल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास नकार दिला आहे. मात्र केंद्र सरकार या कायद्यात सुधारणांबाबत शेतकऱ्यांना बुधवारी लेखी प्रस्ताव देणार आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेते हनन मुला यांनी सांगितले की, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास नकार दिला आहे. कृषी कायद्यातील सुधारणांबाबत केंद्र सरकार बुधवारी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना लिखित प्रस्ताव देणार आहेत. या प्रस्तावावर शेतकरी विचार करणार आहेत. दरम्यान, बुधवारी केंद्र सरकारसोबत होणारी बैठक होणार नसल्याचेही मुला यांनी सांगितले. अखिल भारतीय किसान सभेचे महासचिव असलेल्या हनन मुला यांनी सांगितले की, उद्या सिंघू बॉर्डरवर दुपारी १२ वाजता शेतकऱ्यांची बैठक होणार आहे. आता या बैठकीमधून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पुढील दिशा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात आज देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला देशातील विविध भागात चांगला प्रतिसाद मिळाला. या शेतकऱ्यांकडून पुकारण्यात आलेल्या या बंदला विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा जाहीर केला होता.

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीAmit Shahअमित शहा