शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा! सरकार आयपीसी, सीआरपीसी, फॉरेन्सिक आणि पुरावा कायद्यात सुधारणा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 15:05 IST

आज दिल्लीतील पोलिसांचा ७६ वा रायझिंग परेड डे साजरा झाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हजेरी लावली.

आज दिल्लीतील पोलिसांचा ७६ वा रायझिंग परेड डे साजरा झाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हजेरी लावली. यावेळी शाह यांनी एक मोठी घोषणा केली. 'भारतीय दंड संहिता अर्थात IPC, फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजेच CRPC आणि पुरावा कायदा यातील काही कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.  

'माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे की मी ७५ वर्षांहून अधिक काळाच्या वारशाचा एक भाग आहे. दिल्ली पोलीस हे स्वातंत्र्यापासून आजपर्यंतच्या कामासाठी ओळखले जाते आणि संपूर्ण देशाने त्यांचे कौतुक केले आहे. सेवेत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो . स्वातंत्र्यानंतर दिल्ली पोलिसांनी शांती, सेवा, न्यायचा नारा देत आपल्या कामात आणि कार्यपद्धतीत बदल घडवून आणले, जे देशासाठी फायदेशीर आहेत, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, भारतीय दंड संहिता अर्थात IPC, फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजेच CRPC आणि पुरावा कायदा यातील काही कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत.'स्वातंत्र्यापूर्वी पोलिसांच्या कामात सेवेचे नाव नव्हते, पण आता सेवेची भावना निर्माण झाली आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात दिल्ली पोलिसांच्या योगदानाचे खूप कौतुक करण्यात आले. दिल्लीत राहणार्‍या भारतीय नागरिकांना त्यांच्या पासपोर्टची काळजी करण्याची गरज नाही कारण त्यांना आता 5 दिवसात पोलीस क्लिअरन्स मिळणार आहे. मोबाईल कॅमेऱ्याद्वारे पासपोर्ट सेवेची पडताळणी केली जाईल.

'भारताची कायदा आणि सुव्यवस्था, सुरक्षेमध्ये 2014 पासून सकारात्मक विकास झाला आहे. पूर्वी काश्मीरमध्ये दररोज निदर्शने, दगडफेक आणि जाळपोळ व्हायची. आज काश्मीर पर्यटकांनी भरलेला आहे. काश्मीरचा विचार करताना, देशभर फिरताना देशातील नागरिकांना खूप सशक्त वाटते. डाव्या राजकारणाची आणि अतिरेकीपणाची उदाहरणे आता बरीच कमी झाली आहेत, असंही अमित शाह म्हणाले. 

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: कोणत्याही क्षणी निर्णय, सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवला; शिंदे-ठाकरेंचा युक्तीवाद संपला

देशाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेपासून ते जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी तसेच दगडफेक करणार्‍यांवर ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली, ते कोणापासूनही लपलेले नाही. दिल्ली पोलिसांना मोबाईल फॉरेन्सिक सायन्स व्हॅन उपलब्ध करून दिल्याने गुन्ह्यांची प्रकरणे लवकरात लवकर सोडवण्यात आणि पुरावे गोळा करण्यात मदत होईल, असंही शाह म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा