मोदी सरकार विकसीत करतंय स्वत:ची GPS यंत्रणा, तुम्हाला असा मिळेल फायदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 18:14 IST2022-12-23T18:13:56+5:302022-12-23T18:14:18+5:30
केंद्र सरकारकडे लवकरच टाइम डिसेमिनेशन नावाचा नवा प्रोजेक्ट असणार आहे. याअंतर्गत सरकार स्वत:ची जीपीएस सॅटेलाइट यंत्रणा तयार करणार आहे.

मोदी सरकार विकसीत करतंय स्वत:ची GPS यंत्रणा, तुम्हाला असा मिळेल फायदा!
केंद्र सरकारकडे लवकरच टाइम डिसेमिनेशन नावाचा नवा प्रोजेक्ट असणार आहे. याअंतर्गत सरकार स्वत:ची जीपीएस सॅटेलाइट यंत्रणा तयार करणार आहे. भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ कज्युमर अफेअरचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी पब्लिक अफेयर्स फोरम ऑफ इंडियामध्ये याची माहिती दिली. या प्रोजेक्टमुळे सायबर क्राइमशी निगडीत प्रकरणं सोडवण्यात खूप मदत होणार आहे.
ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित सिंग म्हणाले, सरकार लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साठी नवीन मापदंड निश्चित करेल. AI चे सर्व पैलू चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सरकार यूएस सरकारसोबत काम करत आहे. मंत्रिमंडळाने गुन्हेगारीकरणाच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे जे लवकरात लवकर सादर केलं जाऊ शकतं.
ग्राहक व्यवहार विभाग प्राइज स्टेबलायझेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर सारखे विविध मुद्दे कसे हाताळतो याचीही माहिती दिली. ग्राहकांशी संबंधित समस्यांचे मूळ शोधून त्या दूर करता याव्यात यासाठी विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. रोहित सिंग म्हणाले की, जेव्हा कंपन्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल तेव्हाच अर्थव्यवस्था विकसित होईल.
ग्राहक व्यवहार विभागाने एक ग्राहक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. हेल्पलाइन क्रमांकावर ग्राहकांच्या सर्वाधिक तक्रारी ई-कॉमर्सशी संबंधित होत्या, ज्या गेल्या वर्षभरात ८ टक्क्यांवरून ४८ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. ई-कॉमर्स सेवांमुळे ग्राहक आणि सेवा यांच्यातील नाते संपुष्टात आले आहे, यामुळेच ग्राहक असुरक्षित आहेत, असंही ते म्हणाले.