राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:38 IST2025-10-01T13:38:35+5:302025-10-01T13:38:57+5:30
RSS 100 Years News: गुरुवारी विजयादशमी दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतक महोत्सव साजरा होणार आहे. या निमित्त आज संघाच्या देशाप्रति योगदानाची दखल म्हणून केंद्र सरकारने आज विशेष टपाल तिकीट आणि नाणं प्रसिद्ध केलं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
गुरुवारी विजयादशमी दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतक महोत्सव साजरा होणार आहे. या निमित्त आज संघाच्या देशाप्रति योगदानाची दखल म्हणून केंद्र सरकारने आज विशेष टपाल तिकीट आणि नाणं प्रसिद्ध केलं. या टपाल तिकिटावर संघाने प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर केलेल्या संचालनाचा फोटो आहे. तर १०० रुपयांच्या विशेष नाण्यावर भारतमातेची पूजा करतानाचं चित्र मुद्रित करण्यात आलं आहे. भारताच्या नाण्यावर भारतमातेची मुद्रा स्वातंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मुद्रित करण्यात आली आहे, असे या कार्यक्रमावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेष नाण्यावर ‘राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय इदं न मम’, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बोधवाक्य कोरलेलं आहे. तसेच आज जे विशेष टपाट तिकीट प्रसिद्ध झालं आहे, त्याचं एक खास महत्त्व आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनाचं किती महत्त्व असतं हे आपणा सर्वांना माहितच आहे. १९६३ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकही या संचालनामध्ये सहभागी झाले होते. या टपाल तिकीटामध्ये त्याच ऐतिहासिक क्षणाच्या स्मृती आहेत.
नरेंद्र मोदी म्हणाले की, संघाचे स्वयंसेवक निरंतरपणे देशाच्या सेवेत गुंतलेले आहेत. समाजाला सशक्त करत आहेत. त्याचीही झलक या टपाल तिकिटामध्ये आहे. मी हे विशेष नाणं आणि टपाल तिकिटासाठी देशवासियांना शुभेच्छा देतो. ज्या प्रकारे मोठ्या नद्यांच्या किनाऱ्यावर मानवी संस्कृती बहरते, त्याच प्रमाणे संघाच्या किनाऱ्यावरही शेकडो आयुष्यं प्रफुल्लित झालेली आहेत. जशी कुठलीही नदी ज्या रस्त्यांवरून त्या ठिकाणांना आपल्या पाण्याने समृद्ध करते. जैसे कोई नदी जिन रास्तों से गुजरती है उन क्षेत्रों को, वहां की भूमि को अपने तसेच संघाने या देशाच्या प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक पैलूला आपला स्पर्श केलेला आहे. हे एका अविरत तपाचं फळ आहे, असेही मोदींनी सांगितले.