सरकारी पैशांवर डल्ला, आयडीएफसी फर्स्ट बँकेत; कर्मचाऱ्यांनी बाहेरच्यांशी मिळून वळती केली रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 05:45 IST2026-02-24T05:44:32+5:302026-02-24T05:45:43+5:30

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, या प्रकरणामुळे संपूर्ण बँकिंग व्यवस्थेला कोणताही धोका (सिस्टेमिक रिस्क) नाही.

Government money was stolen in IDFC First Bank; Employees diverted the money in collusion with outsiders | सरकारी पैशांवर डल्ला, आयडीएफसी फर्स्ट बँकेत; कर्मचाऱ्यांनी बाहेरच्यांशी मिळून वळती केली रक्कम

सरकारी पैशांवर डल्ला, आयडीएफसी फर्स्ट बँकेत; कर्मचाऱ्यांनी बाहेरच्यांशी मिळून वळती केली रक्कम

नवी दिल्ली: आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या चंदीगड शाखेत हरयाणा सरकारच्या खात्यांमधून ५९० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. बँक कर्मचाऱ्यांनी आणि बाहेरच्या काही व्यक्तींनी मिळून हरियाणा सरकारच्या खात्यांमधील रक्कम काही लोकांच्या खात्यात वळती केली. त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, या प्रकरणामुळे संपूर्ण बँकिंग व्यवस्थेला कोणताही धोका (सिस्टेमिक रिस्क) नाही. आयडीएफसी फर्स्ट बँकेबाबत कोणत्याही सिस्टिमची समस्या नसल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे.

सरकारने टाकले काळ्या यादीत

हरयाणा सरकारने 'आयडीएफसी फर्स्ट' आणि 'एयू स्मॉल फायनान्स' बँकेला सरकारी व्यवहारांतून काळ्या यादीत टाकले आहे. सर्व सरकारी विभागांना या बँकांमधील खाती बंद करून निधी वळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नेमके काय आणि कसे घडले?

१८ फेब्रुवारी २०२६ रोजी हरियाणा सरकारच्या संस्थांना त्यांच्या खात्यांतील प्रत्यक्ष शिल्लक रकमेतील तफावत आढळून आली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला.

आधी खात्यातील शिल्लकमध्ये ४९० कोटी रुपयांची तफावत आढळली. पुढील तपासात आणखी १०० कोटींची विसंगती समोर आली.

बँकेच्या माहितीनुसार, संबंधित शाखेतील काही कर्मचाऱ्यांनी बाहेरील व्यक्तींशी संगनमत करून हा गैरव्यवहार केला. यासाठी बनावट धनादेश (चेक) आणि खोट्या अधिकृत पत्रांचा वापर करण्यात आला.

मॅन्युअल पद्धतीने व्यवहार नोंदवून कोट्यवधी रुपये बँकेबाहेरील इतर लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये वळवण्यात आले. ही रक्कम ५०० कोटीपेक्षा अधिक होती.

बँकेच्या एमडीचे काय म्हणणे ?

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही वैद्यनाथन यांनी सांगितले की, संशयित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यंत वरिष्ठ व्यवस्थापनाचा सहभाग आढळला नाही.
प्राथमिक तपासानुसार हा कर्मचारी स्तरावरील फसवणुकीचा प्रकार आहे. बाह्य घटकही या सहभागी असल्याचे दिसते."

'बँकिंग यंत्रणा' सुरक्षितच आरबीआयने दिली ग्वाही

आम्ही घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. हा घोटाळा केवळ चंदीगड शाखेतील काही ठराविक खात्यांपुरताच मर्यादित आहे. या प्रकरणी चार संशयित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून गुन्हेगारी कारवाई सुरू केली आहे, असे आरबीआयने म्हटले आहे.

शेअर्सला लोअर सर्किट

या घडामोडीनंतर आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या शेअर्समध्ये सोमवारी २० टक्क्यांची घसरण झाली. समभाग १९.९९ टक्क्यांनी घसरून ७०.०४ रुपये या खालच्या सर्किट मर्यादेवर बंद झाले. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे भांडवल १४ हजार कोटींनी घटले आहे.

हरियाणा सरकारने एयू स्मॉल फायनान्स बँकेला सरकारी व्यवहारांमधून वगळल्याने बँकेचे समभागही ७.६२ टक्क्यांनी घसरले.

Web Title : आईडीएफसी फर्स्ट बैंक घोटाला: हरियाणा सरकार का धन हड़पा, कर्मचारी शामिल

Web Summary : आईडीएफसी फर्स्ट बैंक की चंडीगढ़ शाखा में हरियाणा सरकार के खातों से 590 करोड़ रुपये का घोटाला सामने आया। कर्मचारियों ने बाहरी लोगों के साथ मिलकर धन का गबन किया। हरियाणा ने आईडीएफसी फर्स्ट और एयू स्मॉल फाइनेंस बैंक को ब्लैकलिस्ट किया। आरबीआई ने बैंकिंग प्रणाली की सुरक्षा का आश्वासन दिया।

Web Title : IDFC First Bank Scam: Haryana Funds Embezzled, Employees Implicated

Web Summary : Rs 590 crore fraud in Haryana government accounts at IDFC First Bank's Chandigarh branch was exposed. Employees colluded with outsiders to divert funds. Haryana blacklisted IDFC First and AU Small Finance Bank. RBI assures banking system safety.