दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 18:13 IST2025-10-24T17:57:59+5:302025-10-24T18:13:32+5:30
बीएसएफ क्रीडा कोट्याअंतर्गत कॉन्स्टेबल (GD) पदासाठी अर्ज स्वीकारत आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन नोंदणी करू शकता.

दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
दहावी उत्तीर्ण झालेल्या तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. भारतीय लष्करामध्ये ३९१ पदांसाठी भरती निघाली आहे. सीमा सुरक्षा दलाने कॉन्स्टेबल पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती क्रीडा कोट्याअंतर्गत आयोजित केली आहे. कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात.
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 391 कॉन्स्टेबल (GD) पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 4 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
पगार किती मिळणार?
कॉन्स्टेबल (GD) पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा २१,७०० रुपये ते ६९,१०० रुपये दरम्यान वेतन दिले जाईल.
वयोमर्यादा
अर्ज करण्यासाठी किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २३ वर्षे आहे. विशेष श्रेणीतील उमेदवारांसाठी वयात सूट देखील उपलब्ध आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना वयात ५ वर्षांची सूट मिळेल आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षांची सूट मिळेल.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिवाय, उमेदवारांनी गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने मान्यता दिलेल्या आंतरराष्ट्रीय खेळात प्रतिनिधित्व केलेले असणे किंवा पदक जिंकलेले असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. सामान्य आणि ओबीसी पुरुष उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १५९ रुपये आहे.
ऑनलाइन अर्ज असा करा
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, आधी अधिकृत वेबसाइट, rectt.bsf.qov.in ला भेट द्या.
त्यानंतर, वेबसाइटच्या होमपेजवरील ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करा.
अर्ज लिंकवर क्लिक केल्यानंतर, आवश्यक माहिती भरा.
आता, तुमची शैक्षणिक पात्रता त्यात भरा आणि विहित अर्ज शुल्क भरा.
शेवटी, फॉर्म सबमिट केल्यानंतर, त्याची प्रिंटआउट घ्या.