चीनवर आणखी एक 'डिजिटल स्ट्राईक', मोदी सरकारकडून ४३ ऍप्स बॅन; पाहा संपूर्ण यादी

By कुणाल गवाणकर | Published: November 24, 2020 05:36 PM2020-11-24T17:36:32+5:302020-11-24T18:00:09+5:30

government of india blocks 43 mobile apps: देशाच्या सुरक्षेचा विचार करून माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा निर्णय

government of india blocks 43 mobile apps for security reasons | चीनवर आणखी एक 'डिजिटल स्ट्राईक', मोदी सरकारकडून ४३ ऍप्स बॅन; पाहा संपूर्ण यादी

चीनवर आणखी एक 'डिजिटल स्ट्राईक', मोदी सरकारकडून ४३ ऍप्स बॅन; पाहा संपूर्ण यादी

googlenewsNext

नवी दिल्ली: मोदी सरकारनं ४३ मोबाईल ऍप्सवर बंदीची कारवाई केली आहे. देशाची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्व कायम राखण्यासाठी ऍप्सवर बंदीची कारवाई करण्यात आल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं सांगितलं. माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याच्या अधिनियम ६९ ए अंतर्गत सरकारनं ही कारवाई केली आहे. याआधी सरकारनं चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालय आणि सायबर क्राईम कॉर्डिनेशन सेंटरकडून मिळालेल्या अहवालांनंतर सरकारनं ऍप्स बंदीचं पाऊल उचललं. 

मोदी सरकारनं बॅन केलेल्या ऍप्समध्ये बहुतांश ऍप्स चिनी आहेत. यामध्ये अलीबाबा वर्कबेंच, अली पे कॅशियर, डिलिव्हरी ऍप लालमोव इंडिया, स्नॅक व्हिडीओसारख्या ऍप्सचा समावेश आहे. मोदी सरकारनं कारवाई केलेले काही ऍप्स जुने आहेत. तर बरेचसे ऍप्स सपोर्टिव्ह आहेत.




अली बाबाचे काही ऍप्स याआधीच बंद करण्यात आले. आता अली बाबाच्या सपोर्टिंग ऍप्सवर बंदीची कारवाई झाली आहे. यामध्ये AliSuppliers, AliExpress आणि AliPay Cashier चा समावेश आहे. बंदीची कारवाई झालेले बरेचसे ऍप फारसे लोकप्रिय नाहीत. या ऍप्सना पूर्णपणे ब्लॉक करण्यात आलं आहे की त्यांना प्ले स्टोरमधून हटवलं जाणार आहे, याबद्दलची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

या ऍप्सवर सरकारनं घातली बंदी-
1. AliSuppliers Mobile App
2. Alibaba Workbench
3. AliExpress - Smarter Shopping, Better Living
4. Alipay Cashier
5. Lalamove India - Delivery App
6. Drive with Lalamove India
7. Snack Video
8. CamCard - Business Card Reader 
9. CamCard - BCR (Western)
10. Soul- Follow the soul to find you
11. Chinese Social - Free Online Dating Video App & Chat
12. Date in Asia - Dating & Chat For Asian Singles
13. We Date-Dating App
14. Free dating app- Singol, start your date!
15. Adore App
16. TrulyChinese - Chinese Dating App
17. TrulyAsian - Asian Dating App
18. ChinaLove: dating app for Chinese singles
19. DateMyAge: Chat, Meet, Date Mature Singles Online
20. AsianDate: find Asian singles
21. FlirtWish: chat with singles
22. Guys Only Dating: Gay Chat
23. Tubit: Live Streams
24. We Work China
25. First Love Live- super hot live beauties live online
26. Rela - Lesbian Social Network
27. Cashier Wallet
28. MangoTV
29. MGTV- HunanTV official TV APP
30. WeTV - TV version
31. WeTV - Cdrama, Kdrama&More
32. WeTV Lite
33. Lucky Live- Live Video Streaming App
34. Taobao Live
35. DingTalk
36. Identity V
37. Isoland 2: Ashes of Time
38. BoxStar (Early Access)
39. Heroes Evolved
40. Happy Fish
41. Jellipop Match- Decorate your dream island!
42. Munchkin Match: magic home building
43. Conquista Online II

Web Title: government of india blocks 43 mobile apps for security reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.