शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"कर्नाटकातील सरकार कोसळणार, ५०-६० आमदारांसह मंत्री भाजपात जाणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 09:38 IST

कर्नाटकमधील काँग्रेस सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केलं आहे. 

बंगळुरू - देशातील ५ राज्यातील विधानसभा निवडणूक निकालात भाजपाने घवघवती यश मिळवलं आहे. त्यामुळे, आगामी लोकसभा २०२४ च्या निवडणुकांसाठी भाजपाचा आत्मविश्वास दुणावला असून भाजपाने तयारीही सुरू केली आहे. येथील तेलंगणात राज्यातही भाजपने १ जागेवरुन ८ जागांवर आघाडी घेतली. मात्र, येथे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून काँग्रेसच्या रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कर्नाटक राज्यही भाजपला गमवावं लागलं होतं. मात्र, कर्नाटकमधील काँग्रेस सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केलं आहे. 

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपने आश्चर्यकारक सरकार स्थापन केलं होतं. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिर्रादित्य शिंदेंना आपल्या पक्षात घेत भाजपाने तेथील काँग्रेसचं सरकार पाडलं. तसेच, महाराष्ट्रातही शिवसेनेत मोठा बंड झाला आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात ४० ते ५० आमदारांनी भाजपासोबत महायुती करुन सरकार स्थापन केलं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आता, भाजपने कर्नाटकातही तोच फॉर्म्युला अवलंबण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. कारण, जनता दल सेक्युलर पक्षाचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी लवकरच कर्नाटक सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे.  कर्नाटकमध्ये मंत्री असलेला एक काँग्रेस नेता ५० ते ६० आमदारांसह लवकरच भाजपात प्रवेश करेल. कदाचित लवकरच कर्नाटकमधील काँग्रेस सरकार कोसळेल, काहीही घडू शकतं. असा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे. कोणाच्याचही प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठपणा राहिलेला नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, कुमारस्वामी यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून कर्नाटक सरकारवर चर्चा रंगली आहे. तर, काँग्रेसही अलर्ट मोडवर असून याबाबच चाचपणी सुरू करेल, असे दिसून येते.  

टॅग्स :congressकाँग्रेसMLAआमदारministerमंत्रीkumarswamyकुमारस्वामीKarnatak Politicsकर्नाटक राजकारण