"हे सरकार म्हणजे निवडणूक जिंकणारं मशीन"; मेहबुबा मुफ्तींनी साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 08:01 PM2021-01-31T20:01:50+5:302021-01-31T20:04:45+5:30

पाकिस्तान आणि चीन सोबतच भारताचे संबंध नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेसोबतही चांगले नाहीत, मुफ्ती यांचं वक्तव्य

"This government is an election-winning machine"; Mehbooba Mufti took aim | "हे सरकार म्हणजे निवडणूक जिंकणारं मशीन"; मेहबुबा मुफ्तींनी साधला निशाणा

"हे सरकार म्हणजे निवडणूक जिंकणारं मशीन"; मेहबुबा मुफ्तींनी साधला निशाणा

googlenewsNext
ठळक मुद्देभारताचे संबंध नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेसोबतही चांगले नाहीत, मुफ्ती यांचं वक्तव्यकलम ३७० चे अधिकार असते तर कृषी कायदे लागू केले नसते : मुफ्ती

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. हे सरकार म्हणजे निवडणुका जिंकणारं मशीन आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. याव्यतिरिक्त त्यांनी कलम ३७० आणि कृषी कायद्यांवरही भाष्य केलं. 

"पाकिस्तान आणि चीन सोबतच भारताचे संबंध नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकेसोबतही चांगले नाहीत. जेव्हा पाकिस्तानसोबत संबंध बिघडतात तेव्हा सीमेवरील लोकांनाही त्याचा त्रास होतो. त्याचप्रमाणे चीनसोबत सुरू असलेल्या तणावामुळे आपले २२ जवानही शहीद झाले. हे सरकार म्हणजे निवडणुका जिंकणारं मशीन आहे," असं म्हणत मुफ्ती यांनी सरकारवर निशाणा साधला. 



"जम्मू काश्मीरकडे कलम ३७०चे अधिकार असते तर नवे कृषी कायदे जम्मू काश्मीरमध्ये कधीही लागू केले गेले नसते. जम्मू काश्मीरमध्ये तेच कायदे लागू झाले असते ज्याची आवश्यकता होती," असंही त्या म्हणाल्या. यापूर्वीही त्यांनी केंद्र सरकार लोकांचा आवाज दाबत असल्याचा आरोप केला होता. लोकांना बोलण्याची परवनागी नाही, ही परिस्थिती एका प्रेशर कुकरप्रमाणे आहे. परंतु जेव्हा प्रेशर कुकरचा स्फोट होते तेल्हा तो पूर्ण घराला जाळतो. एक अशी वेळ येईल जेव्हा सरकार हात जोडून विशेष दर्जासोबत आणखी काय हवं असंही विचारेल असंही त्या म्हणाल्या होत्या.

Web Title: "This government is an election-winning machine"; Mehbooba Mufti took aim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.