शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

सरकारकडे बेरोजगारांची आकडेवारीच नाही, श्रीकांत शिंदेंचा मोदींवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2018 1:13 AM

बेरोजगारीच्या समस्येकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा हल्ला कल्याणचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ च्या आकडेवारीनुसार देशात तीन कोटींहून अधिक लोक बेरोजगार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नवी दिल्ली : बेरोजगारीच्या समस्येकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा हल्ला कल्याणचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ च्या आकडेवारीनुसार देशात तीन कोटींहून अधिक लोक बेरोजगार असल्याची माहिती त्यांनी दिली.ते म्हणाले, जागतिक बँकेच्या अहवालानुसार दरवर्षी दीड कोटी लोक जॉब मार्केटमध्ये प्रवेश करतात; पण सरकारकडे रोजगाराची आकडेवारीच नाही. पंतप्रधानांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. या हिशेबाने आज साडेचार वर्षांनंतर ९ कोटी लोकांना रोजगार मिळायला हवा होता. वाढत्या बेरोजगारीमुळे मॉब लिंचिंगचे प्रकार होत असल्याचे राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनीच म्हटल्याची आठवण शिंदे यांनी सत्ताधारी भाजपला करून दिली.त्यांचे आरक्षण काढाअनेक पिढ्यांपासून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांचा सामाजिक स्तर उंचावला आहे. तो तपासून त्या-त्या जातींचे आरक्षण कमी करण्याची मागणी उस्मानाबादचे प्रा. रवींद्र गायकवाड यांनी केली. मराठा आरक्षणामुळे सुरू असलेल्या वादाचा संदर्भ त्यांनी दिला. एससी, एसटी, ओबीसी आरक्षणास धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे, असे गायकवाड म्हणाले.खºया‘अनुसूचित जमाती’लाभापासून वंचितअनुसूचित जमातींसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनेक सामान्य जातींमधील विद्याथ्याचा ‘एसटी’ संवर्गात समावेश केला जात आहे. त्यामुळे खºया अनुसूचित जमातीतील लोकांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही, अशी तक्रार दिंडोरीचे हरिंश्चद्र चव्हाण यांनी केला. राजकीय दबावापोटी हा प्रकार होत आहे. आदिवासींच्या नावाखाली भलत्यांनाच नोकºया मिळत आहेत, असे ते म्हणाले.स्वामिनाथन आयोगधानासाठी महाराष्ट्र सरकारने ३ हजार २५० रूपये भाव देण्याची मागणी केली होती. केंद्राने १५५० रूपये भाव दिला. कापसासाठी ७ हजार २०४ रूपये मागितले असताना साडेचार हजार रूपये दिले.ही तफावत टाळण्यासाठी 'सी-२' प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात ११ हजार ९५० शेतकºयांनी आत्महत्या केल्या.वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठीएमएसपी निश्चित करण्यात आली असली तरी ते न्यूनतम समर्थन मूल्यावरच निश्चित होते. त्यामुळे स्वामिनाथन आयोगाची ‘सी २’ शिफारस मान्य करावी, असे त्या म्हणाल्या.जहाजबांधणीतील बेरोजगारीत वाढजहाजबांधणी क्षेत्रात सातत्याने वाढणाºया बेरोजगारीकडे मुंबईचे अरविंद सावंत यांनी लक्ष वेधले. लेबर कन्व्हेन्शननुसार या क्षेत्रातील कर्मचाºयांना दरमहा ६१४ डॉलर्स मिळायला हवेत. पण १०५ डॉलर्स अर्थात सात हजार रूपय देण्यात येतात. त्यामुळे या क्षेत्रातील लोकांमध्ये अस्वस्थता आहे, असे सावंत म्हणाले. केंद्रीय जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी म्हणाले, २०१० साली सी फेरर्सची संख्या ६२ हजार २१४ होती. सात वर्षांत ती १ लाख ५४ हजारांवर पोहोचली. देशात १५७ प्रशिक्षण संस्था आहे, तर संस्थांचे कॅपेसिटी युटिलायझेशन ७० टक्के आहे. त्यात वाढ करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.

टॅग्स :ParliamentसंसदShrikant Shindeश्रीकांत शिंदे