शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीवर सरकार चिंतेत, अनेक नावांवर नोंदवला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 08:36 IST

देशातल्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून सरकार चिंतेत पडलं आहे. ज्या 126 नावांची शिफारस करण्यात आली आहे, त्यातील अनेक नावांवर सरकारनं आक्षेप नोंदवला आहे.

नवी दिल्ली- देशातल्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून सरकार चिंतेत पडलं आहे. ज्या 126 नावांची शिफारस करण्यात आली आहे, त्यातील अनेक नावांवर सरकारनं आक्षेप नोंदवला आहे. केंद्राकडून उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी किमान उत्पन्न, प्रामाणिकपणा आणि त्या न्यायाधीशांची क्षमता हे मापदंड ठरवण्यात आले आहेत. तसेच सरकारनं गुप्तचर विभागाच्या मदतीनं न्यायाधीश बनण्याच्या रांगेत असलेल्या सर्व ज्येष्ठ वकिलांची कुंडली मिळवली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजियमलाही याची माहिती देण्यात आली आहे. 

ज्यांचं नाव उच्च न्यायालयातील न्यायाधीश बनण्याच्या शर्यतीत आहे. अशा वकिलांची कायदा मंत्रालयानं सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजियमकडून चौकशीची मागणी केली आहे. सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी त्यांचं किमान उत्पन्न, त्यांच्याद्वारे घेण्यात आलेले निर्णय, त्यांची समाजातील प्रतिमा, व्यक्तिगत आणि व्यावसायिक कामाचं स्वरूप हे निकष ठेवले आहेत. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसंबंधित सरकारनं कायदा मंत्रालयात प्रणाली बनवली आहे. जेणेकरून सरकार शिफारस करण्यात आलेल्या नावांच्या व्यक्तिगत पार्श्वभूमीसंदर्भात माहिती मिळवू शकते. त्यानंतर या कार्यपद्धतीला अंतिम स्वरूप देण्यात येते.

न्यायमूर्ती जोसेफ यांनी घेतली तिसऱ्या क्रमांकावरच शपथ, अन्य दाेन न्यायाधीश शपथबद्धसुप्रीम कोर्टात प्रथमच असणार तीन महिला न्यायाधीशसूत्रांच्या माहितीनुसार, 126 नावांपैकी 30 ते 40 उमेदवार हे न्यायाधीश बनण्याच्या योग्यतेचे नसल्याचा सरकारचा दावा आहे. सरकारला अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून सुचवण्यात आलेल्या नावांवर आक्षेप होता. शिफारस करण्यात आलेल्या 33 वकिलांच्या नावांची चौकशी केली असता, त्यातील जवळपास अर्ध्या डझनांहून अधिक वकील हे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या जवळचे आहेत. तसेच धर्म, जातीच्या आधारेही काही वकिलांची शिफारस करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांमार्फत शिफारस करण्यात आलेल्या वकिलांच्या पार्श्वभूमी तपासली जाणार असून, त्यानंतर चौकशीअंती अंतिम यादी बनवली जाईल, असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालयCourtन्यायालय