टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 06:47 IST2026-04-04T06:47:22+5:302026-04-04T06:47:22+5:30

डिजिटल क्रांती होत असताना दुसरीकडे वाहनधारकांच्या खिशाला मात्र कात्री

Government Bans Cash Payments on National Highways Starting April 10 | टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार

टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. येत्या १० एप्रिलपासून देशातील सर्व टोल नाक्यांवरील रोख (कॅश) व्यवहार पूर्ण बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे आता टोल प्लाझावर केवळ फास्टॅग, 'यूपीआय'द्वारेच व्यवहार करता येतील. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी व टोल नाक्यांवरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे

१० एप्रिलपूर्वी फास्टॅग रिचार्ज करा

देशातील सुमारे १,१५० टोल नाक्यांवर ही नवीन व्यवस्था लागू होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असला, तरी वाढीव दरांमुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर मात्र परिणाम होणार आहे. त्यामुळे १० एप्रिलपूर्वी फास्टेंग रिचार्ज करून ठेवणे वाहनधारकांसाठी हिताचे ठरेल.

महागाईचा 'टोल': प्रवासासाठी मोजावे लागणार जादा पैसे 

एकीकडे डिजिटल क्रांती होत असताना दुसरीकडे वाहनधारकांच्या खिशाला मात्र कात्री बसणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआय आणि उत्तर प्रदेश एक्स्प्रेस वे औद्योगिक विकास प्राधिकरणाने (यूपीईआयडीए) टोलच्या दरांमध्ये पुढीलप्रमाणे वाढ केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग : कार आणि प्रवासी वाहनांच्या टोलमध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

एक्स्प्रेस वे: उत्तर प्रदेशातील एक्स्प्रेस वेवरील टोल दरात १.५० ते ३.५० टक्क्यांची वाढ झाली आहे.
 

Web Title : टोल प्लाजा पर नकद बंद: 10 अप्रैल से हाईवे पर डिजिटल भुगतान अनिवार्य

Web Summary : 10 अप्रैल से, सभी भारतीय टोल प्लाजा नकद रहित होंगे, केवल FASTag और UPI स्वीकार किए जाएंगे। इस कदम का उद्देश्य भीड़भाड़ को कम करना है लेकिन बढ़ी हुई दरें यात्रियों के बजट को प्रभावित करेंगी। टोल दरों में 10% तक की वृद्धि होने वाली है।

Web Title : Cashless Toll Plazas: India Goes Digital on Highways from April 10

Web Summary : From April 10th, all Indian toll plazas will be cashless, accepting only FASTag and UPI. The move aims to ease congestion but increased rates will affect commuters' budgets. Toll rates are set to increase upto 10%.