शासन आपल्या दारीला प्रतिसाद
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:13+5:302015-09-01T21:38:13+5:30
तळेगाव ढमढेरे : येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमास विविध गावांतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शासन आपल्या दारीला प्रतिसाद
त ेगाव ढमढेरे : येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमास विविध गावांतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे गीताई विष्णू मंगल कार्यालयात महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारित समाधान योजनेमधून घेण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते झाले. या वेळी तहसीलदार राजेंद्र पोळ, सरपंच ताई शेलार, पंचायत समितीचे सदस्य आनंदराव हरगुडे, राजेंद्र भुजबळ, भगवान शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब नरके, माजी सरपंच पोपट भुजबळ, विविध गावांचे ग्रामस्थ, प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी विविध प्रकारच्या अडचणी घेऊन आलेल्या ग्रामस्थांची कामे १५ दिवसांच्या आत पूर्ण करावीत, कामे पूर्ण न झालेल्या तक्रारी आल्यास संबंधित अधिकार्यांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल. या वेळी तळेगाव ढमढेरे येथे तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयाचे काम तातडीने पूर्ण करून घेण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या. शासन आपल्या दारी कार्यक्रमात पंचायत समिती, तहसीलस्तरावरील सर्व प्रकारचे दाखले, शिधापत्रिका बदलणे, विद्यार्थी शिष्यवृत्ती वाटप, विविध लाभांच्या योजना, आम आदमी विमा योजना, मोफत डोळे तपासणी आदी विभागाशी संबंधित अडचणी समजावून घेऊन त्याच ठिकाणी सोडवण्यात आल्या. परिसरातील ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.०००००