तुमच्याकडे मळलेल्या, फाटक्या नोटा आहेत?... या नोटा बँकांमधून अशा बदलून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 18:30 IST2018-07-13T18:29:52+5:302018-07-13T18:30:31+5:30
मळलेली, तुटलेली नोट म्हणजे काय हे आधी जाणून घ्या...

तुमच्याकडे मळलेल्या, फाटक्या नोटा आहेत?... या नोटा बँकांमधून अशा बदलून घ्या!
मुंबई- कधीकधी आपल्या नकळत एखादी फाटकी नोट किंवा मळलेली नोट येते आणि नंतर ती नोट नंतर तुमच्याकडून कोणीच स्वीकारत नाही. असा त्रासदायक अनुभव तुम्हाला आला असेल. रिझर्व्ह बँकेने 'मळलेल्या' नोटेचीही व्याख्या केली आहे. यामध्ये सततच्या वापराने, घामाने मळलेल्या नोटांचा आणि एकाच नोटेचे तिच्या सर्व वैशिष्ट्यांसह दोन तुकडे चिकटवून जोडलेली नोट यांचा समावेश होतो. या नोटा बदलण्यासाठी तुम्ही मार्गांचा वापर करु शकता.
1) रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, मळलेल्या, फाटलेल्या नोटा प्रत्येक बँकेने घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन नव्या नोटा घेऊ शकता.
2) याबद्दल तुम्हाला कोणतीही रक्कम द्यावी लागणार आहे. मळलेल्या, फाटक्या नोटा येथे बदलून मिळतील अशी पाटी प्रत्येक बँकेत लावण्यात यावी असे रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आदेश दिले आहेत. त्यामुळे तुम्ही त्या बँकेतील खातेदार नसलात तरी तुम्हाला नोटा बदलून मिळतील.
3) सरकारची विविध देयके उदाहरणार्थ पाण्याचे बील, वीजबील, घरफाळा, स्वच्छता कर तुम्ही या नोटा देऊन भरू शकता.
4) या नोटा तुम्ही तुमच्या खात्यात रक्कम भरण्यासाठी वापरू शकता. या नोटा रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार पुन्हा सार्वजनिक वापरासाठी बाहेर येणार नाहीत. त्या रिझर्व्ह बँकेत पाठवल्या जातील.
5) जर तुम्ही 5 नोटांपर्यंत नोटा बदलण्याचा प्रयत्न करत असाल आणि जर संबंधित शाखा ते देण्यास सक्षम नसेल तरीही तुम्ही त्या नोटा भरु शकता. त्या नोटांच्या बदल्यात तुम्हाला एक पावती मिळेल. त्यानंतर 30 दिवसांच्या आत तुम्हाला तुमचे फाटक्या नोटांच्या बदल्यातील नव्या नोटा परत मिळतील.