शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोरक्षकांचा हिंसाचार : तीन राज्यांना सर्वोच्च न्यायालयानं बजावली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 17:43 IST

गोरक्षेच्या नावाखाली हिंसा करण्यासाठी तीन राज्यांना सर्वोच्च न्यायालयानं अवमान नोटीस पाठवली आहे. राजस्थान, हरिणाया आणि उत्तर प्रदेश ही राज्य सरकारे कथित गोरक्षकांचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरली आहेत.

नवी दिल्ली- कथित गोरक्षकांच्या हिंसा रोखण्यात अपयश आलेल्या तीन राज्यांना सर्वोच्च न्यायालयानं अवमान नोटीस पाठवली आहे. राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश ही राज्य सरकारे कथित गोरक्षकांचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरली आहेत. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं त्यांना चांगलंच फटकारलं आहे. या तिन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांना अवमान नोटीस पाठवून सर्वोच्च न्यायालयानं त्यांना धारेवर धरलं आहे.या प्रकरणात तुषार गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेत त्यांनी सर्वोच्च न्यायालयानं आदेश देऊनही राज्य सरकारे गोरक्षकांना लगाम घालण्यात अपयशी ठरली आहेत, असं नमूद केलं आहे. गांधी यांनी याचिकेत कथित गोरक्षकांकडून झालेल्या सात हल्ल्यांचाही उल्लेख केला आहे. राजस्थानमध्ये गोरक्षकांकडून पहलू खान नामक व्यक्तीची मारहाण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात सप्टेंबर 2017मध्ये झालेल्या सुनावणीतही सर्वोच्च न्यायालयानं राजस्थान सरकारला खडे बोल सुनावले होते.गोरक्षकांच्या नावाखाली हिंसा करणा-या लोकांना कायद्याच्या कचाट्यात आणणं गरजेचं आहे. तसेच अशा प्रकारात राज्य सरकारांनी पीडित कुटुंबांना नुकसानभरपाई द्यावी, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं कथित गोरक्षकांच्या नावानं हिंसाचार करणा-यांना प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हास्तरावर नोडल ऑफिसर नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाची राज्य सरकारांनी अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. या प्रकरणी कडक भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयानं या तिन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRajasthanराजस्थानHaryanaहरयाणाUttar Pradeshउत्तर प्रदेश