शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाची बातमी! महिला आरक्षणाचे कायद्यात रुपांतर; राष्ट्रपतींची सही झाली, अजून तीन टप्पे बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 19:17 IST

Nari Shakti bill Latest Update: लोकसभेत आणि राज्यसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. परंतू यासाठी या कायद्याला आणखी तीन टप्प्यांतून जावे लागणार आहे. 

महिला आरक्षण विधेयकाचे आज कायद्यात रुपांतर झाले आहे. नारी शक्ती विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. हे विधेयक सर्व संमतीन २० सप्टेंबरला लोकसभेत आणि २१ सप्टेंबरला राज्यसभेत मंजुर करण्यात आले होते. अखेर २९ सप्टेंबरला त्याचे कायद्यात रुपांतर झाले आहे. महिला आरक्षण कायदा लागू होताच लोकसभेत आणि राज्यसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. परंतू यासाठी या कायद्याला आणखी तीन टप्प्यांतून जावे लागणार आहे. 

कायद्याची पूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी त्याला राज्यांकडून मान्यता मिळणे आवश्यक आहे, त्यानंतर पुढची पायरी म्हणजे जनगणना जी अत्यंत महत्त्वाची आहे आणि शेवटची पायरी म्हणजे मर्यादा. संविधानानुसार 2026 पर्यंत सदस्यांच्या मर्यादेवर म्हणजे सीमांकनावर बंदी आहे. त्यानंतर सीमांकन करता येईल. यामुळे हे विधेयक आता जरी कायदा बनले तरी ते २०२६ नंतरच प्रत्यक्षात लागू होणार आहे. 

कलम ३६८ अन्वये केंद्राच्या कोणत्याही कायद्याचा राज्यांच्या अधिकारांवर काही परिणाम होत असेल तर कायदा करण्यासाठी किमान ५० टक्के विधानसभांची मंजुरी घ्यावी लागते. म्हणजेच किमान 14 राज्यांच्या विधानसभांनी मंजूर करावे लागते. महिला आरक्षणावर विरोधकांची भुमिका पाहता ते खूप सोप्पे आहे. परंतू जनगणना आणि सीमांकन या कायद्याला मोठी अडकाठी आहे.

कोविडमुळे 2021 ची जनगणना होऊ शकली नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर जनगणनेचे काम सुरू होणार आहे. यामुळे हा कायदा २०२६ लाच लागू होणार आहे. त्यानंतरच्या निवडणुकांत याचा वापर केला जाणार आहे. 

टॅग्स :Women Reservationमहिला आरक्षणDraupadi Murmuद्रौपदी मुर्मू