शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

कोरोना लसीच्या आधीच गुड न्यूज! लहान मुलांसाठी पहिली स्वदेशी न्युमोनिया लस लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 8:30 PM

serum institute pneumonia vaccine : सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या न्यूमोनियावरील स्वदेशी लसीची बाजारपेठेत विक्री करण्यास औषध महानियंत्रकांनी जुलैमध्ये परवानगी दिली होती. या लसीच्या मानवी चाचण्यांचे तीन टप्पे सीरम इन्स्टिट्यूटने भारत तसेच आफ्रिकेतील गाम्बिया या देशात पार पडले होते.

देशात कोरोना लसीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. त्याआधीच भारतीयांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. लहान मुलांसाठी न्युमोनियावर स्वदेशी लस लाँच झाली आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने सांगितले की, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना एका कार्यक्रमात ही लस लाँच केली. भारतामध्ये न्यूमोनियामुळे अर्भके मरण पावण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्यासाठी सीरमची स्वदेशी लस वरदान ठरणार आहे. फायझर व ग्लॅक्सोस्मिथक्लाइन या विदेशी कंपन्यांनी न्यूमोनियावर बनविलेल्या लसी सध्या बाजारात उपलब्ध असून त्यापेक्षा सीरमच्या लसीची किंमत खूपच कमी आहे.

अदार पुनावाला यांनी ट्विट करून या लसीची माहिती दिली आहे. डॉ. हर्षवर्धन, लहान मुलांना न्युमोनियापासून वाचविण्यासाठी सीरमने बनविलेली पहिली मेड इन इंडिया लस  लस निमोसिल लाँच केल्याबद्दल धन्यवाद असे ते म्हणाले. 

सीरमने सांगितले की, न्युमोनिया हे कोरोनाच्या गंभीर लक्षणांपैकी एक आहे. यामुळे ही लस लहान मुलांमध्ये न्युमोनिया होण्यापासून वाचविणार आहे. कोरोनासाठी सध्या लस विकसित केली जात आहे, ती मुलांसाठी नाहीय. यामुळे ही न्युमोनिया लस लहान मुलांना गंभीर कोरोना लक्षणांपासून वाचविण्याची शक्यता आहे. 

केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले, ही लस देशातील पब्लिक हेल्थकेअरसाठी मोठी उपलब्धी आहे. ही स्वस्त आणि उच्च प्रतीची लस आहे, जी मुलांना न्युमोनियापासून मुक्त करेल. 

सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या न्यूमोनियावरील स्वदेशी लसीची बाजारपेठेत विक्री करण्यास औषध महानियंत्रकांनी जुलैमध्ये परवानगी दिली होती. या लसीच्या मानवी चाचण्यांचे तीन टप्पे सीरम इन्स्टिट्यूटने भारत तसेच आफ्रिकेतील गाम्बिया या देशात पार पडले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य