अच्छा हुआ उर्वरीत बातमी

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:32+5:302015-08-26T23:32:32+5:30

ग्यानदासजींच्या अध्यक्षपदावरील दाव्याबाबत ते म्हणाले की, २००४ साली उज्जैन येथे झालेल्या बैठकीत ग्यानदासजींची अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानंतर पाच वर्षांसाठी त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ केवळ हरिद्वारच्या कुंभमेळ्यापुरतीच सीमित होती. हरिद्वारचा कुंभमेळा संपताच त्यांची अध्यक्षपदाची मुदत संपुष्टात आलेली आहे. पण ही गोष्ट मान्य करायला ते तयार नाहीत. त्यांनी यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१२ रोजी अलाहाबाद येथे झालेल्या शेवटच्या शाहीस्नानापर्यंतच मुदत दिली. त्यानंतर अध्यक्षपदाची मुदत संपल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. पण ग्यानदासजी कोर्टाचे आदेशही मानत नसतील तर यावर काय बोलावे, अशा शब्दांत नरेंद्रगिरी महाराजांनी आपली भावना व्यक्त केली.

Good news left | अच्छा हुआ उर्वरीत बातमी

अच्छा हुआ उर्वरीत बातमी

यानदासजींच्या अध्यक्षपदावरील दाव्याबाबत ते म्हणाले की, २००४ साली उज्जैन येथे झालेल्या बैठकीत ग्यानदासजींची अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानंतर पाच वर्षांसाठी त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ केवळ हरिद्वारच्या कुंभमेळ्यापुरतीच सीमित होती. हरिद्वारचा कुंभमेळा संपताच त्यांची अध्यक्षपदाची मुदत संपुष्टात आलेली आहे. पण ही गोष्ट मान्य करायला ते तयार नाहीत. त्यांनी यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१२ रोजी अलाहाबाद येथे झालेल्या शेवटच्या शाहीस्नानापर्यंतच मुदत दिली. त्यानंतर अध्यक्षपदाची मुदत संपल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. पण ग्यानदासजी कोर्टाचे आदेशही मानत नसतील तर यावर काय बोलावे, अशा शब्दांत नरेंद्रगिरी महाराजांनी आपली भावना व्यक्त केली.
कोट
पाच महिन्यांपूर्वी उज्जैन येथे लोकशाही पद्धतीने दहा आखाड्यांच्या उपस्थितीत आपली अध्यक्षपदी निवड करण्यात आली. अनुपस्थित असणार्‍या दोन वैष्णव आखाड्यांनी फोनवरून माझ्या निवडीला मान्यता दिली.
आता पुढील निवडणुकीपर्यंत अध्यक्षपदाची सूत्रे आपणच सांभाळणार असून, हा कुंभमेळा शांततेत, निर्विघ्नपणे आणि आनंदात पार पडण्यावर आपला भर असेल.
- नरेंद्रगिरी महाराज
अध्यक्ष, आखाडा परिषद

Web Title: Good news left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.