शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष्य यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 06:54 IST

अब की बार ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत काही राज्यांमध्ये फटका बसत आहे. काही राज्यांमध्ये जागा कमी होणार असल्याचे अहवाल आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे.

संजय शर्मा -

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, ओडिशानंतर आता दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आशा वाढल्या आहेत. महाराष्ट्रासारख्या काही राज्यांमध्ये जागांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी भाजपने आता उत्तर प्रदेशमध्ये आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.

अब की बार ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत काही राज्यांमध्ये फटका बसत आहे. काही राज्यांमध्ये जागा कमी होणार असल्याचे अहवाल आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. ३७० जागा येतील की ३०० पेक्षा कमी जागा येतील? स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असणारा जादुई आकडा २७२ पर्यंत जाईल की, २५० पर्यंतच जागा जिंकता येतील या प्रश्नांनी भाजप नेत्यांना छळले आहे.

...येथे आनंदाची बातमी- पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये किती जागा वाढणार हे निश्चित आहे. मात्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून भाजपासाठी आनंदाची बातमी आली आहे. - आंध्र प्रदेशात भाजपचा नवा सहकारी तेलुगू देसम पक्ष चांगली कामगिरी करत आहे आणि भाजपलाही त्याच्याशी युती केल्याचा फायदा होत आहे. आंध्रमध्ये भाजप दोन ते तीन जागा जिंकू शकतो, असा अंदाज आहे.

महाराष्ट्रामध्ये जागा कमी होणार? - २०१९ च्या तुलनेत यावेळी भाजपला यावेळी २०२४ मध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणा, राजस्थानमध्ये कमी जागा मिळण्याचा अंदाज आहे.- ज्या राज्यांमध्ये भाजपच्या जागा वाढू शकतात, त्यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रितआता शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी भाजपने उत्तर प्रदेशात आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. नरेंद्र मोदी स्वतः वाराणसीत तळ ठोकून उत्तर प्रदेशातील १३ लोकसभा जागांवर आपले लक्ष केंद्रित करणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या आधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उत्तर प्रदेशात पोहोचत असून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना हिमाचल प्रदेश आणि पंजाबवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत उत्तर प्रदेशातच राहणार आहेत. १ जून रोजी अंतिम फेरीच्या मतदानासाठी ३० मे रोजी निवडणूक प्रचार संपणार आहे.

तेलंगणात किती जागा वाढणार?- तेलंगणातून भाजपसाठी निवडणूक सर्वेक्षण करणारे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी दावा केला आहे की, तेलंगणात भाजपच्या जागा चारवरून वाढत आठ ते दहा होऊ शकतात.- राव हे भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. आंध्र प्रदेशात टीडीपी १५ जागा जिंकू शकते असा त्यांचा दावा आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डाAmit Shahअमित शाहBJPभाजपाElectionनिवडणूक 2024