शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

DRDO's Corona drug: खूशखबर! DRDO चा 'प्राणवायू' पुढच्या आठवड्यात येणार; 2-डीजी औषध कोरोनावर रामबाण ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 9:52 AM

2-deoxy-D-glucose (2-DG) drug of DRDO: 11-12 मे पासून हे औषध बाजारात उपलब्ध होण्यास सुरूवात होईल, असा दावा डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतिश रेड्डी यांनी केला होता. मात्र, या तारखेला ते उपलब्ध करू शकले नाहीत.

कोरोना रुग्णांवर इलाजासाठी डीआरडीओने (DRDO) बनविलेले औषध 2 डीऑक्सी-डी ग्लूकोज (2-डीजी) चा (DRDO’s 2-DG drug) पहिला 10000 डोसचा पहिली बॅच पुढील आठवड्यात लाँच केली जाणार आहे. डीआरडीओच्या अध्यक्षांनी याआधी हे औषध 11-12 मे रोजी बाजारात आणले जाणार आहे, अशी घोषणा केली होती. आता नव्या वेळेची माहिती डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Defence Research and Development Organisation’s 2-DG drug for treatment of Covid-19 one week ago, 10,000 doses of the drug are expected to be released in few days.)

11-12 मे पासून हे औषध बाजारात उपलब्ध होण्यास सुरूवात होईल, असा दावा डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतिश रेड्डी यांनी केला होता. मात्र, या तारखेला ते उपलब्ध करू शकले नाहीत. डीआरडीओ आणि डॉ. रेड्डीज लॅबद्वारे तयार केल्या जाणाऱ्या या औषधाला औषध महानियंत्रकाकडून मंजुरी मिळाली आहे. या औषधाच्या जोसनंतर ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाला २-३ दिवसांमध्ये ऑक्सिजन सपोर्टवरून काढता येईल. ते लवकरच बरे होतील, असे ते म्हणाले होते. 

कोरोनाच्या सर्व स्ट्रेनवर परिणामकारक...डीआरडीओच्या वैज्ञानिकांनुसार 2 डीजी कोरोनाच्या प्रत्येक स्ट्रेनविरोधात लढण्यास सक्षम आहेत. हे औषध कोरोना व्हायरसच्या प्रोटिनऐवजी मानवाच्या शरिरातील पेशींच्या प्रोटिनमध्ये बदल करते. यामुळे हा व्हायरस पेशींमध्ये राहू शकत नाही. तर अन्य औषधे, लसी य़ा व्हायरसच्या प्रोटीनवर वार करतात. यामुळे जेव्हा व्हायरसचे म्युटेशन होते, तेव्हा अनेक औषधे निष्प्रभ ठरतात. 

आजवर तीनवेळा मानवी चाचण्याया औषधाच्या आजवर तीनवेळा मानवी चाचण्या झाल्याचे डीआरडीओनं म्हटलं आहे. देशभरात ११ रुग्णालयांमध्ये ११० कोरोना रुग्णांवर या औषधाच्या दुसऱ्या फेरीतील चाचण्या गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबर या कालावधीत पार पडल्या. ज्यांनी हे औषध घेतले नव्हते त्यांच्यापेक्षा ज्यांनी हे औषध घेतले होते ते अडीच दिवस आधीच बरे झाले. या औषधाची मानवी चाचण्यांची तिसरी फेरी डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत महाराष्ट्रासह देशभरातील २७ रुग्णालयांमध्ये पार पडली. त्यात सहभागी झालेल्यांपैकी ४२ टक्के रुग्णांच्या प्रकृतीत खूप सुधारणा होऊन त्यांना बाहेरुन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची गरज उरली नाही. तर ज्यांना हे औषध दिले नव्हते त्या रुग्णांपैकी फक्त ३१ टक्के रुग्णांनाच बाहेरून दिलेल्या ऑक्सिजनची गरज उरली नाही. 

टॅग्स :DRDOडीआरडीओcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या