Good News : भारतात तयार होत असलेली कोविशिल्ड ९० टक्के प्रभावी, सीरमने दिली खूशखबर

By बाळकृष्ण परब | Published: November 23, 2020 03:59 PM2020-11-23T15:59:07+5:302020-11-23T16:06:21+5:30

Coronavirus Vaccine Updates:  ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेकाने एक पत्रक प्रसिद्ध करून सांगितले की, युनायटेड किंग्डम आणि ब्राझीलमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये लस प्रभावी दिसून आली आहे.

Good News: Covishield being made in India is 90% effective, Serum gave good news | Good News : भारतात तयार होत असलेली कोविशिल्ड ९० टक्के प्रभावी, सीरमने दिली खूशखबर

Good News : भारतात तयार होत असलेली कोविशिल्ड ९० टक्के प्रभावी, सीरमने दिली खूशखबर

Next
ठळक मुद्देरम इंस्टिट्युटने अ‍ॅस्ट्राजेनेकाची कोविशिल्ड ही लस कोरोना विषाणूपासून बचाव करण्यात ९० टक्के प्रभावी असल्याचे सांगितले जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या भारतासह जगभरात २१२ जागांवर लस तयार करण्यात येत आहेदेशातील फ्रंटलाइन हेल्थ वर्कर्ससाठी पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये कोरोना विषाणूवरील लस उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांची संख्या ९१ लाखांच्या वर गेली आहे. तसेच काही भागात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे चिंता वाढत आहे. यादरम्यान भारताला मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे. भारतात ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत मिळून काम करत असलेल्या सीरम इंस्टिट्युटने अ‍ॅस्ट्राजेनेकाची कोविशिल्ड ही लस कोरोना विषाणूपासून बचाव करण्यात ९० टक्के प्रभावी असल्याचे सांगितले आहे.

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेकाने एक पत्रक प्रसिद्ध करून सांगितले की, युनायटेड किंग्डम आणि ब्राझीलमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये लस प्रभावी दिसून आली आहे. आधी ही अर्धी लस दिल्यावर ९० टक्क्यांपर्यंत प्रभावी दिसून आली आहे. त्यानंतर पूर्ण डोस दिल्यानंतर ६२ टक्क्यांपर्यंत प्रभाव दिसून आला. त्यानंतर एका महिन्यानंतर पुन्हा दोन पूर्ण डोस दिल्यावर ७० टक्क्यांपर्यंत प्रभाव दिसून आला. ही लस पुण्यामधील सीरम इंन्स्टिट्युट ऑफ इंडियाकडून तयार करण्यात येत आहे. ही लस भारतामध्ये कोविशिल्ड या नावाने उपलब्ध होणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या भारतासह जगभरात २१२ जागांवर लस तयार करण्यात येत आहे. या २१२ लसींपैकी १६४ लसी ह्या प्री क्लिनिकल स्टेजमध्ये आहेत. दिलासादायक बाब म्हणजे ११ लसी ह्या चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. यामध्ये फायर-बायोएनटेक आणि अमेरिकेतील फार्मास्युटिकल कंपन्यांनी आपल्या कोविड-१९ व्हॅक्सिनच्या ह्युमन ट्रायलचे निष्कर्ष जारी केले आहे. मॉडर्ना व्हॅक्सिन ९४.५ टक्के आणि फायझर-बायोएनटेक ९५ टक्के प्रभावी दिसून आली आहे. आता दोन्ही कंपन्या मान्यतेसाठी अर्ज करणार आहेत. त्यानंतर या वर्षअखेरीस यांच्या प्रॉडक्शनची सुरुवात होणार आहे.

देशातील फ्रंटलाइन हेल्थ वर्कर्ससाठी पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये कोरोना विषाणूवरील लस उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या व्हॅक्सिनला आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्याची शक्यता आहे. तर भारतात तयार होत असलेली भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनलासुद्धा फेब्रुवारीपर्यंत एमर्जंन्सी मान्यता देण्यात येण्याची शक्यता आहे.

Web Title: Good News: Covishield being made in India is 90% effective, Serum gave good news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.