शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

लय भारी; कोरोनाची लस मिळणार अवघ्या २२५ रुपयांत ! सिरम'इन्स्टिट्यूटने जाहीर केली किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 7:36 PM

मोठी सकरात्मक बातमी! पुढील वर्षीपर्यंत लसीच्या तब्बल १० कोटी डोसचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट

ठळक मुद्दे‘गावी’ आणि ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’सोबत करार

पुणे : कोरोनापासून बचावासाठी जगभरात लस विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच भारतासह जगभरातील गरीब देशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटकडून अवघ्या २२५ रुपयांत लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी सिरमसोबत ‘गावी’ (जीएव्हीआय) ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून आर्थिक सहकार्य मिळणार आहे. याअंतर्गत पुढील वर्षीपर्यंत लसीच्या तब्बल १० कोटी डोसचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी ट्टिटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. आॅक्सफर्ड विद्यापीठाकडून विकसित केलेल्या लशीच्या दुसऱ्या व तिसऱ्यया टप्प्यातील मानवी चाचणी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘सिरम’ला नुकतीच परवानगी दिली आहे. त्यानुसार या लशीच्या मानवी चाचण्यांना लवकरच सुरूवात होणार आहे. आॅक्सफर्डने केलेल्या पहिल्या चाचणीत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने या लशीबाबत आशादायक चित्र निर्माण झाले आहे. या लशीच्या निर्मितीसाठी सिरमसोबत ‘अ­ॅस्ट्राझेनेका’ या कंपनीने करार केला आहे. तसेच अमेरिकेतील ‘नोव्हाव्हॅक्स’ या कंपनीशीही लसनिर्मितीसाठी करार केला आहे. आता या लशींच्या निर्मितीसाठी ‘गावी’ व गेट्स फाऊंडेशनही पुढे सरसावले आहे. या लसींच्या मानवी चाचणी यशस्वी झाल्यास निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गेट्स फाऊंडेशनकडून ‘गावी’ला ११२५ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असून या निधीतून ‘गावी’कडून सिरमला लस उत्पादनासाठी सहकार्य केले जाईल. त्यामुळे ही लस सर्वसामान्यांना तीन डॉलर्स म्हणजे केवळ २२५ रुपयांत मिळू शकेल. भारतासह जगभरातील ९२ गरीब देशातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादन कंपनी असलेल्या ‘सिरम’ला या सहकार्यामुळे लसींच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे शक्य होणार आहे. या देशांना २०२१ च्या सुरूवातीलाच १० कोटी लस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ‘सिरम’वर असेल. तसेच गरज भासल्यास आणखी लशींचा पुरवठा केला जाणार आहे.---कोरोना विषाणुचा प्रसार जगभरात वेगाने होत आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी गरीब देशांमध्ये परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा व उपचार मिळायला हवेत.अधिकाधिक लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ‘गावी’व गेट्स फाऊंडेशनचे सहकार्य मिळाले असून २०२१ मध्ये भारतासह अन्य गरीब देशांना १० कोटी डोस पुरविले जातील.- आदर पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिरम इन्स्टिट्युट

टॅग्स :PuneपुणेCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकारHealthआरोग्य