गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 08:53 IST2025-12-31T08:52:09+5:302025-12-31T08:53:52+5:30
ही सवलत १४ जानेवारी ते १४ जुलै २०२६ या कालावधीत लागू राहणार असून यामुळे प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार आहे...

गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
नवी दिल्ली: रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे मंत्रालयाने सवलत योजना आणली असून, रेलवन अॅपच्या माध्यमातून अनारक्षित तिकिटे खरेदी करणाऱ्या प्रवाशांना ३ टक्के सूट देण्यात येणार आहे. डिजिटल तिकीट बुकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
ही सवलत १४ जानेवारी ते १४ जुलै २०२६ या कालावधीत लागू राहणार असून यामुळे प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
आतापर्यंत काय होते? -
सध्या रेल वन अॅपवर आर-वॉलेट वापरून अनारक्षित तिकीट बुक केल्यास ३% कॅशबॅक दिला जातो. रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, ही कॅशबॅक योजना पूर्वीप्रमाणे सुरूच राहणार आहे.
३% सूट अॅपवर केलेल्या सर्व डिजिटल पेमेंट मोडसाठी असेल.
नवीन बदल काय? कशी मिळेल सूट?
फक्त रेलवन अॅपवरच ही सवलत उपलब्ध असेल.
कोणत्याही डिजिटल पेमेंट मोडद्वारे (यूपीआय, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आदी) तिकीट खरेदी केल्यास थेट ३% सूट मिळणार आहे
इतर कोणत्याही ऑनलाइन अनारक्षित तिकीट प्लॅटफॉर्मवर ही योजना लागू नाही.
या योजनेचा आढावा मे २०२६ मध्ये घेण्यात येणार आहे.