सोने पुन्हा २८ हजारांच्या वर
By Admin | Updated: January 20, 2015 02:28 IST2015-01-20T02:28:56+5:302015-01-20T02:28:56+5:30
सलग तिसऱ्या दिवशी खरेदीचा जोर कायम राहिल्याने आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी १०० रुपयांनी वधारून सोन्याच्या भावाने प्रति १० ग्रॅमसाठी २८,००० रुपयांची पातळी ओलांडली.

सोने पुन्हा २८ हजारांच्या वर
नवी दिल्ली : सलग तिसऱ्या दिवशी खरेदीचा जोर कायम राहिल्याने आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी १०० रुपयांनी वधारून सोन्याच्या भावाने प्रति १० ग्रॅमसाठी २८,००० रुपयांची पातळी ओलांडली. जागतिक बाजारातील तेजीने लग्नसराईच्या काळातली ग्राहकांची गरज भागविण्यासाठी आभूषण निर्मात्यांनी मोठी खरेदी केल्याने स्थानिक सराफ्यात सोन्याचा भाव २८,०८० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. तथापि, चांदीचा भाव ४५ रुपयांच्या घसरणीसह ३९,१०० रुपये प्रतिकिलोवर आला. आभूषण निर्मात्यांनी ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी जोरदार खरेदी केली.