शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रकिनारी चक्क सोन्याचे कण सापडले; गावकऱ्यांची पळापळ, सरकारी अधिकारीही सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 07:07 IST

जो तो आपले नशीब आजमावण्यासाठी किनाऱ्यावर धाव घेऊ लागला. लाटांनी किनाऱ्यावर आणलेला गाळ चाळून त्यातून सोने शोधण्याची धडपड सुरू झाली.

काकिनाडा : नीवर चक्रीवादळाने अलीकडेच तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या किनारी भागांना तडाखा दिला. किनारी भागातील अनेक गावांचे नुकसान झाले. मात्र, आंध्र प्रदेेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील उप्पाडा गावासाठी नीवर चक्रीवादळ वरदान ठरले. कारण चक्रीवादळानंतर येथील समुद्रकिनाऱ्यावर चक्क सोन्याचे कण आढळू लागले आहेत! रेशमी साड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या उप्पाडा गावातील मच्छिमारांना गेल्या आठवड्यात समुद्रकिनाऱ्यावर चक्क सोन्याचे कण सापडू लागले. किनाऱ्यावर सोने सापडत असल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली. 

जो तो आपले नशीब आजमावण्यासाठी किनाऱ्यावर धाव घेऊ लागला. लाटांनी किनाऱ्यावर आणलेला गाळ चाळून त्यातून सोने शोधण्याची धडपड सुरू झाली. आतापर्यंत ५० लोकांना प्रत्येकी साडेतीन हजार रुपये किमतीचे सोने सापडल्याचा दावा येथील स्थानिकांनी केला आहे. मात्र, प्रत्येकाला सोने मिळालेच असे नाही. तरीही किनाऱ्यावर सोन्याचा शोध सुरूच आहे. 

हे असे का झाले?समुद्रकिनाऱ्यावर सोने का सापडत आहे, याचे ठोस कारण कोणाला सांगता आलेले नाही. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथील किनारी भागातील जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अलीकडेच दोन मंदिरे पडल्याच्या घटना घडल्या. तसेच तुफानी वाऱ्यांमुळे घरे कोसळण्याचेही प्रकार घडले आहेत.

पडलेली घरे व मंदिरे समुद्री लाटांनी आत ओढून नेली. नवीन वास्तू वा मंदिर बांधताना पायाभरणीवेळी सोने अर्पण करण्याची गावात प्रथा आहे. कदाचित समुद्राच्या उदरात गडप झालेल्या या घर वा मंदिराच्या पायाभरणीचे सोने समुद्री लाटा किनाऱ्यावर घेऊन येत असतील, असा अंदाज स्थानिक पोलिस व्यक्त करत आहेत. दरम्यान, महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी लवकरच येथील परिसराची पाहणी करणार आहेत.

टॅग्स :Goldसोनं