भगवंताचे ध्येय भक्त कल्याण
By Admin | Updated: August 26, 2015 00:18 IST2015-08-26T00:18:57+5:302015-08-26T00:18:57+5:30
नाशिक : भगवान शंकर आदिदेव असून, श्रीरामाने रामेश्वर येथे शिवलिंगाची स्थापना केली. त्याचप्रमाणे रावणदेखील शिवभक्त होता. रावण कायम शिवमंदिरात शिवभक्तीमध्ये रममाण होता तरीही त्याच्या जीवनाचे ध्येय स्वकल्याण होते, तर रामाच्या जीवनाचे ध्येय जनतेचे आणि भक्तांचे कल्याण होते. भक्त हा भगवानच्या सेवेत लीन असतो. श्रीहनुमान हे श्रीरामाच्या सेवेत तर नंदीजी भगवान शंकराच्या सेवेसाठी तयार असतात. संतांनी भगवान आणि भक्त यांचे खूप चांगले वर्णन केलेले आहे. म्हणूनच संतदेखील खूप श्रेष्ठ आहेत. भगवानाची महिमा भक्त आणि संतांनी कायम ठेवला म्हणूनच मनुष्याच्या जीवनात समता, ज्ञान, प्रेम, शांती आणि आनंद निर्माण होतो. ज्या देशात संत महापुरुष आणि सद्भक्त जन्म घेतात तो देश महान असतो.

भगवंताचे ध्येय भक्त कल्याण
न शिक : भगवान शंकर आदिदेव असून, श्रीरामाने रामेश्वर येथे शिवलिंगाची स्थापना केली. त्याचप्रमाणे रावणदेखील शिवभक्त होता. रावण कायम शिवमंदिरात शिवभक्तीमध्ये रममाण होता तरीही त्याच्या जीवनाचे ध्येय स्वकल्याण होते, तर रामाच्या जीवनाचे ध्येय जनतेचे आणि भक्तांचे कल्याण होते. भक्त हा भगवानच्या सेवेत लीन असतो. श्रीहनुमान हे श्रीरामाच्या सेवेत तर नंदीजी भगवान शंकराच्या सेवेसाठी तयार असतात. संतांनी भगवान आणि भक्त यांचे खूप चांगले वर्णन केलेले आहे. म्हणूनच संतदेखील खूप श्रेष्ठ आहेत. भगवानाची महिमा भक्त आणि संतांनी कायम ठेवला म्हणूनच मनुष्याच्या जीवनात समता, ज्ञान, प्रेम, शांती आणि आनंद निर्माण होतो. ज्या देशात संत महापुरुष आणि सद्भक्त जन्म घेतात तो देश महान असतो. दिव्य मुरारी महाराजश्रीत्यागी भक्तमल बडा खालसा