शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

देव आमच्या पाठीशी, अखेर सत्याचाच विजय होईल, केजरीवाल यांचे भाजपावर टीकास्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 20:01 IST

आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या शिफारशीवर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  देव आमच्या पाठीशी, अखेर सत्याचाच विजय होईल, असा टोला केजरीवाल यांनी ट्विटरवरून लगावला.

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या शिफारशीवर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  देव आमच्या पाठीशी, अखेर सत्याचाच विजय होईल, असा टोला केजरीवाल यांनी ट्विटरवरून लगावला.ट्विटमध्ये केजरीवाल म्हणतात," देवाने गेल्या निवडणुकीत आम्हाला 67 जागा काही विशिष्ट्य हेतूनेच दिल्या होत्या. पावलोपावली देव आमच्या पाठीशी आहे. अन्यथा आमची योग्यताच काय होती. आता केवळ सत्याचा मार्ग सोडू नका," आपच्या आमदारांना देण्यात आलेल्या त्रासाचा उल्लेख करत केजरीवाल यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमामधून तीव्र नाराजी व्यक्त केली. "या लोकांनी आम्हाला खूप त्रास दिला. आमच्या आमदारांवर खोटे खटले दाखल केले. माझ्यावर सीबीआयकडून छापे टाकण्यास लावले. पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही.  अखेर आमच्या 20 आमदारांना अपात्र ठरवण्यात आले," अशी टीका केजरीवाल यांनी केली. दरम्यान, राष्ट्रपतींनी 20 आमदारांना अपात्र ठरवण्याचा दिलेला निर्णय लोकशाहीसाठी मारक असल्याचे मत आम आदमी पक्षाने व्यक्त केले होते. संसदीय सचिवपदी नेमणूक करून लाभाचे पद (हाऊस ऑफ प्रॉफिट) मिळवल्याप्रकरणी दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीचे 20 आमदार अपात्र ठरले आहेत. निवडणूक आयोगाच्या शिफारशीला आज राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. त्यामुळे दिल्लीतल्या अरविंद केजरीवाल सरकारला मोठा धक्का बसला आहे. आपच्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या शिफारसी निवडणूक आयोगाने शुक्रवारी राष्ट्रपतींकडे पाठवल्या होत्या. त्यावर राष्ट्रपतींनी मंजुरीची मोहर उमटवली आहे. हा निर्णय निवडणूक आयोगाने राजकीय सूडबुद्धीने घेतल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केला आहे. या निर्णयामुळे केजरीवालांना मोठा झटका बसला आहे. तर पदावर राहण्याचा नैतिक अधिकार केजरीवाल हरवून बसल्याची टीका भाजपानं केली आहे, या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचे आपने जाहीर केले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘आप’च्या 20 आमदारांची संसदीय सचिव म्हणून नेमणूक केली होती. या नियुक्त्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 102 (1) (अ) अन्वये बेकायदा असून, त्या करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही, अशी याचिका राष्ट्रीय मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष रवींद्र कुमार यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली. या नियुक्त्या नियम धाब्यावर बसवून झाल्या आहेत. दिल्लीत विधानसभेचे सदस्य असताना कोणीही हे पद स्वीकारू शकत नसल्याने 20 आमदारांचे संसदीय सचिवपद रद्द केल्याचे दिल्ली उच्च न्यायालयानं स्पष्ट केले होते, तर आमदारांच्या या पदांना संरक्षण देण्यासाठी केजरीवाल सरकारने विधानसभेत मंजूर केलेले विधेयकावर राष्ट्रपतींनी आयोगाचे मत मागवले होते.  

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालPoliticsराजकारणIndiaभारत