शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Goa Assembly Election 2022 results: निवडणूक जिंकूनही भाजपचा आमदार नाराज, कार्यकर्त्यांवर लावले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 16:38 IST

Goa Assembly Election 2022 results: पणजीत उत्पल पर्रीकर यांना हरवणारे भाजप आमदार अतानसिओ मोन्सेरात नाराज आहे.

पणजी: आज गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. गोव्याची राजधानी पणजी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अतानसिओ मोन्सेरात (Atanasio Monserrate) यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांचा अल्प मतांनी पराभव केला. पण, विजय मिळवल्यानंतरही मॉन्सेरात नाराज आहे. तसेच, त्यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar)  यांना अनौपचारिकपणे पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे.

विजयी झाल्यानंतर एका पत्रकाराशी बोलताना मोन्सेरात म्हणाले की, 'मला वाटतं की, भाजपच्या कार्यकर्त्यांनी मला पक्षात स्वीकारलेलं नाही. उत्पल पर्रीकरांना मिळालेल्या मतांवरुन असे दिसते की, आमच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पर्रीकरांना मतदान केले. या जागेवरुन काही मतभेद झाले, पण भाजप नेतृत्वाला डॅमेज कंट्रोल करता आले नाही.'

'पत्नीविरोधात काम केले'ते पुढे म्हणाले की, मी भाजपमधून बाहेर गेलेल्या उत्पल पर्रीकर आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. पण, आमच्या पक्षातील काही लोकांनी छुप्या पद्धतीने पर्रीकरांना मदत केली. इतकच काय, तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझी पत्नी जेनिफर मोन्सेरात (Jennifer Monserrate), हिच्याविरोधताती काम केले. जेनिफर यांनी तळेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली असून, यात त्यांचाही विजय झाला आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलाअतानसिओ मोन्सेरात आणि त्यांची पत्नी जेनिफर या आधी काँग्रेसमध्ये होत्या. गेल्या निवडणुकीत ते दोघेही काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. पण, 2019 मध्ये काँग्रेसमधील काही आमदार भाजपमध्ये सामील झाले. त्या 10 आमदारांच्या गटात हे दोघे पती-पत्नीदेखील होते. भाजपात आल्यानंतर पक्षाने दोघांना तिकीट दिले.

टॅग्स :Goa Assembly Election Results 2022गोवा विधानसभा निवडणूक निकाल २०२२BJPभाजपाUtpal Parrikarउत्पल पर्रिकर