शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

संपादकीय - स्वप्नांच्या गावा जावे, कुठे जायचे ते ठरवूनही घ्यावे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 09:23 IST

- तर कोणती स्वप्ने पाहावीत, हे ठरवता येऊ शकेल का? होय, हे शक्य आहे

श्रीमंत माने

ख्यातनाम गणिती श्रीनिवास रामानुजन यांना अवघड समीकरणाची उकल म्हणे स्वप्नांमध्ये व्हायची. हे त्यांनीच लिहून ठेवले आहे. अल्बर्ट आइनस्टाईन यांना प्रकाशाचा वेग स्वप्नात गवसला. नाईल्स बोर यांना अणूची रचनाही तशीच सापडली. धागा ओवायला सुईचा डोळा कसा असावा हे एलिअस होव यांना स्वप्नातच सुचले आणि ‘फ्रँकन्स्टाईन’ ही जगातील पहिली वैज्ञानिक कादंबरी लिहिणारी मेरी शेली हिला स्वप्नांनीच विज्ञानातील रंजकता दिली अथवा पॉल मॅककर्टनी याला त्याच्या ‘यस्टर्डे’ या प्रसिद्ध गीताची चालही स्वप्नातच सापडली, असे म्हणतात. 

- तर कोणती स्वप्ने पाहावीत, हे ठरवता येऊ शकेल का? होय, हे शक्य आहे. गेली कित्येक वर्षे यावर संशोधन होतेय आणि आपण पाहतोय ते स्वप्न आहे याची स्पष्ट जाणीव असणारे, सुबोध असे स्वप्न कसे पाहता येईल यासाठी ‘ल्युसिड ड्रिमिंग’ नावाची संकल्पनाही प्रचलित आहे. तब्बल ५.७ कोटी युजर्स, तेरा अब्ज पोस्ट व कॉमेंटस असलेल्या ‘रेडीट’ या लोकप्रिय सोशल ऑनलाईन चॅटिंग प्लॅटफार्मवर ल्युसिड ड्रिमिंगची एक कम्युनिटी आहे. हे लोक ल्युसिड ड्रिमिंगचा स्वत:वर प्रयोग करतात व आपले अनुभव इतरांना सांगतात. ते वास्तववादी तसेच कल्पनारम्यही असतात. कुणाला पाण्याखाली श्वास घेता येतो, कुणी भिंतीतून आरपार जाते, कुणी पक्ष्यांप्रमाणे आकाशात विहार करते. 

प्रत्येकालाच रोज स्वप्ने पडतात. पण, सगळीच नियंत्रित किंवा सुबोध नसतात. पाहिलेल्या, ऐकलेल्या, वाचलेल्या घटना किंवा मनातल्या सुप्त इच्छा स्वप्नांमध्ये प्रतिबिंबित होतात. बहुतेकवेळा आपण स्वप्न पाहतोय हे जाणवत नाही. जाणवते तेव्हा त्याचा आनंद खूप वेगळा असतो. दु:खाच्या खोल डोहातून बाहेर येता येते. नावडत्या व्यक्ती किंवा अडचणींच्या प्रसंगांचा धाडसाने स्वप्नातच सामना करता येतो. रोजच्या जगण्यातील घटनांची ठरवून उजळणी होते. नवनव्या कल्पनांचा जन्म होतो किंवा नुसतीच गंमतही करता येते. त्यातूनच स्वप्नांवर नियंत्रण मिळविता आले तर किती भारी असे वाटते. इंग्लंडच्या स्वानसी विद्यापीठातील प्राध्यापक आणि अलीकडेच प्रकाशित ‘द सायन्स ॲण्ड आर्ट ऑफ ड्रीम्स’ पुस्तकाचे सहलेखक मार्क ब्लाग्रोव्ह म्हणतात, की तुम्ही अशा नियंत्रित स्वप्नात अगदी ठरवून जे घडते त्याचा दूर राहून आनंद घेऊ शकता किंवा स्वप्नांच्या कथानकातील नायकही बनू शकता. गाणे, संगीताचा रियाझ करता येतो. भाषणकला किंवा वादविवादाचे कौशल्य मिळविता येते. कमी ताणतणाव असलेले, आत्मप्रतिष्ठा जपणारे, आयुष्यात समाधान पावलेले लोक हे अधिक सहज करू शकतात. त्याचे सकारात्मक परिणाम जाणवतात. उठल्यानंतर प्रसन्न वाटते. दिवसही चांगला जातो. स्वप्नांवर जितके नियंत्रण अधिक तितका हा लाभ अधिक. झोपेचा त्रास अथवा काही मानसिक आजार असलेल्यांनी मात्र हे टाळायला हवे. तर स्वप्नांच्या गावी ठरवून कसे जायचे? रिॲलिटी टेस्टिंग हे त्याचे एक सूत्र आहे. अभ्यासकांनी काही सोप्या टीप्स दिल्या आहेत. जागेपणी हातातल्या ब्रेसलेटकडे पाहून हे सत्य की स्वप्न असे वारंवार विचारत राहिले तर स्वप्न पडते तेव्हा आपण ते अनुभवण्याच्या स्थितीत तुम्ही पोहोचता. हाताची बोटे दुसऱ्या तळहातातून आरपार गेल्याची अशक्यप्राय कल्पना दिवसभर करीत राहिलात तर स्वप्नात ते शक्य होते. यातून ल्युसिड अवस्था प्राप्त होऊ शकते.

वास्तव व स्वप्नाची सांगड घालण्यासंदर्भात एक प्रोटाेकॉल इंटरनॅशनल ऑनलाईन मेडिकल जर्नलने बेरेनिका मॅसिएजेव्हीज यांच्या ‘कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्स ऑफ ल्युसिड ड्रिमिंग’ नावाच्या संशोधनात गेल्या वर्षी प्रकाशित केला. यातून तुम्ही स्वप्नाचे कथानक, पात्रे सारे काही बदलू शकता. ‘फिंगर टॅपिंग टेस्ट’ हे दुसरे सूत्र आहे. अचानक हालचालीचा डार्ट टास्क किंवा मज्जासंस्था, स्नायू व मेंदू यांच्या समन्वयाचा ‘मोटार टास्क’ प्रयोगही असाच आहे. ‘वेक बॅक टू बेड’ (डब्ल्यूबीटीबी) प्रयोगात नेहमी उठता त्याच्या दोन-तीन तास आधीचा अलार्म लावायचा. डोळे जड असतात. त्याला ‘रॅपिड आय मूव्हमेंट’ म्हणतात. अचानक जाग आल्यानंतर मेंदू अधिक सक्रिय होतो. त्यातून सुबोध स्वप्नाची पायाभरणी होते. डोळे बंद करून काय दिसते, ऐकू येते याचा विचार केला तर नंतरचे स्वप्न सुबोध असते. डब्ल्यूबीटीबीच्या जोडीला ‘मेमोरिक इंडक्शन ऑफ ल्युसिड ड्रीम्स’ (माईल्ड) तंत्र वापरता आले तर भन्नाटच. जमले नाही तर मात्र झोपेचे खोबरे.

(लेखक लोकमत, नागपूरचे संपादक आहेत)shrimant.mane@lokmat.com