शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Global Warming : भारताला जीवघेण्या उष्णतेच्या लाटेचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 13:28 IST

जागतिक तापमानवाढ ही संपूर्ण जगासमोरील गंभीर समस्या बनली आहे. येत्या काळात या समस्येचा मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे.

मुंबई  - जागतिक तापमानवाढ ही संपूर्ण जगासमोरील गंभीर समस्या बनली आहे. येत्या काळात या समस्येचा मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता असून, एका अहवालातील माहितीनुसार जर जगाच्या तापमानात दोन डिग्री सेल्शियसने वाढ झाली तर भारताला उष्ण हवेच्या लाटेचा धोका उद्भवू शकतो. 2015 साली भारताला अशाच उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला होता. ज्यामध्ये सुमारे 2500 लोक मृत्युमुखी पडले होते. या उष्णतेच्या लाटेचा पाकिस्तानातील कराची आणि भारतातील कोलकाता या भारतीय उपखंडामधील शहरांना भारतीय सर्वाधिक फटका बसेल. या दोन्ही शहरात 2015 सारखी स्थिती उद्भवू शकेल, अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. जगातील वातावरणात होत असलेल्या बदलांच्या संदर्भात आयपीसीसीचा अहवाल सोमवारी सादर होणार आहे. या अहवालामध्ये जागतिक तापमान वाढीच्या भारताला असलेल्या गंभीर धोक्यासंदर्भात इशारा देण्यात आला आहे. तसेच युनायटेड किंग्डममधील कार्बनब्रिफ या हवामानासंदर्भात माहिती देणाऱ्या संकेतस्थळाने भारतातील मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या चार मोठ्या शहरांसंदर्भात धोक्याचा इशारा दिला आहे. या चारही शहरांमधील सरासरी तापमान गेल्या 147 वर्षांमध्ये 1 डिग्रीने वाढल्याचे या संकेतस्थळाने म्हटले आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात वातावरणातील बदलांसंदर्भात पोलंडमध्ये होणाऱ्या बैठकीत या अहवालामधील काही निष्कर्षांवर चर्चा होणार आहे. तसेच वातावरणातील बदल रोखण्यासाठी सरकारांकडून पॅरिस कराराची समीक्षाही करण्यात येईल. जगातील सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांपैकी एक असल्याने भारतही या बैठकीत महत्त्वाच्या भूमिकेत असेल.  तापमान वाढीबाबत धोक्याचा इशारा देताना या अहवालात  2030 पर्यंत जगाचे सरासरी तापमान 1.5 डिग्रीच्या स्तरावर पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात आले आहे. जर याच गतीने तापमान वाढत राहिले तर 2030 ते 2052 या दरम्यान जागतिक तापमान 15. डिग्री सेल्सीयसने वाढू शकते, असे या अहवालाता म्हटले आहे. 

टॅग्स :weatherहवामानHeat Strokeउष्माघातIndiaभारत