शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शपथपत्रात १०वीचे १२ केले आणि आमदारकी गेली....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 4:42 AM

मणीपूर उच्च न्यायालय : आमदाराची निवड रद्द 

खुशालचंद बाहेती लोकमत न्यूज नेटवर्क इम्फाळ : निवडणूक शपथपत्रात वैवाहिक साथीदार, अवलंबित अपत्ये, शिक्षण, प्रलंबित गुन्हे याची माहिती न देणे किंवा चुकीची देणे हे निवडणूक कायद्याप्रमाणे भ्रष्ट आचरण ठरते, असे ठरवत मणीपूर उच्च न्यायालयाने काँग्रेसचे उमेदवार ओकराम हेनरी सिंग यांची आमदारकी रद्द ठरवली. २०१७च्या मणीपूर विधानसभा निवडणुकीत ओकराम हेनरी सिंग हे उमेदवार होते. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रावर प्रतिस्पर्धी उमेदवार युमरूम एरबोर सिंग यांनी निवडणूक अधिकाऱ्यासमोर आक्षेप नोंदवले. यात हेनरी सिंग यांनी १०व्या विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात ते पदवीधर असल्याचे नमूद होते व आता १२वी लिहिले आहे, असा आक्षेप होता. तसेच त्यांच्यावर १३८ नेगोशीएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टसह ४२० भादंविचा एक आणि एनडीपीएस कायद्याचा एक असे दोन गुन्हे प्रलंबित असल्याचे व त्यांनी याची पूर्ण माहिती शपथपत्रात दिली नसल्याचाही आक्षेप नोंदविण्यात आला; मात्र निवडणूक अधिकाऱ्याने यात कोणतीही कारवाई केली नाही. निवडणुकीत हेनरी सिंग निवडून आले. यानंतर एरबोर सिंग यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली. 

काय म्हटले आहे न्यायालयाने ?n    सुनावणीमध्ये शपथपत्रातील माहिती चुकीची असेल तर निवडणूक अधिकारी अर्ज बाद ठरवू शकतो काय, हा मुद्दा उच्च न्यायालयासमोर होता. उच्च न्यायालयाने यावर होकारार्थी उत्तर देत अशा उमेदवाराचा अर्ज बाद ठरवला पाहिजे, असे स्पष्ट केले.n    शपथपत्रात चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यामुळे मतदारावर अनावश्यक प्रभाव पडतो. त्यांना उमेदवाराबद्दल अचूक माहिती मिळत नाही, त्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्याच्या १२३(२) कलमाप्रमाणे हे उमेदवाराचे निवडणुकीतील भ्रष्ट आचरण आहे. यामुळे मतदारांच्या मुक्तपणे मतदान करण्याच्या अधिकारावर बाधा येते, असे ठरवत उच्च न्यायालयाने हेनरी सिंग यांची निवड रद्द ठरवली. 

टॅग्स :Courtन्यायालय