शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
3
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
4
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
5
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
6
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
7
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
8
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
9
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
10
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
11
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
12
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
13
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
14
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
15
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
16
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
17
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
18
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
19
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
20
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!

वुहानच्या लॅबला वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल द्या, चीनच्या मागणीवर संतापले नेटीझन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 14:47 IST

चीनमधील वुहान इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लॅबला वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल पुरस्कार देण्याची मागणी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. विशेष म्हणजे चीनच्या सरकारी मंत्रालयानेही या मागणीचे समर्थन केले आहे

ठळक मुद्देचीनमधील वुहान इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लॅबला वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल पुरस्कार देण्याची मागणी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. विशेष म्हणजे चीनच्या सरकारी मंत्रालयानेही या मागणीचे समर्थन केले आहे

नवी दिल्ली - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून ते देशातील अर्थव्यवस्थेपर्यंत सर्वांनाच मोठा फटका बसला आहे. अद्यापही कोरोनाचं संकट पूर्णपणे दूर झालं नाही. जगातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही तब्बल 17 कोटींवर पोहोचली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. चीनच्या वुहानमधूनच कोरोनाचा प्रसार झाल्याचं म्हटलं जातं. चीनवर असे आरोपही केले जात असतानाच, चीनने वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची मागणी केली आहे. 

चीनमधील वुहान इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लॅबला वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल पुरस्कार देण्याची मागणी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. विशेष म्हणजे चीनच्या सरकारी मंत्रालयानेही या मागणीचे समर्थन केले आहे. त्यामुळे, जगभरातून चीनी मीडियासह चीनी सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे. चीनचं सरकारी वर्तमानपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियांग यांनी म्हटलं की, वुहान इंस्टीट्यूमध्ये काम करणाऱ्या वैज्ञानिकांनी सर्वप्रथम कोरोना व्हायरसचा जीन शोधून काढल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याऐवजी त्यांना नोबेल पुरस्कार दिला पाहिजे. 

गेल्याच आठवड्यात चीनच्या व्हायरोलॉजिस्ट आणि बॅट वुमेनच्या नावाने कुख्यात असलेल्या शी झेंगली यांनीही रागात येऊन, कोरोना व्हायरसच्या निर्मित्तीला चीनची लॅब जबाबदार असल्याचं स्पष्टपणे नकारले होते. त्यानंतर, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियांनी यांनीही वुहानच्या लॅबमुळेच कोरोना जगभर पसरला, असे म्हणणे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच, जर येथील वैज्ञानिकांनी सर्वप्रथम कोरोनाचा विषाणू शोधला असेल तर या लॅबला वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करायला हवं, असेही झाओ यांनी म्हटलं.  झाओ यांच्या या विधानानंतर जगभरातून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. सोशल मीडियातून त्यांच्यावर हल्लाबोल करण्यात येत असून जर चीनला वैद्यकीय क्षेत्राचा नोबेल पुरस्कार द्यायचा असेल, तर दशतवादी संघटना असलेल्या आयएसआयएसला शांततेचा नोबेल द्यायला हवा, अशी बोचरी टीका शायनिंग स्टार या ट्विटर हँडलवरुन करण्यात आली आहे. त्याससह, अनेकांनी चीनवर खरमरीत शब्दात टीका केली आहे. 

 वुहानच्या प्रयोगशाळेत जिवंत वटवाघूळ

वुहानच्या प्रयोगशाळेत वटवाघळांना जिवंत ठेवले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वुहानच्या प्रयोगशाळेवरील संशय अधिकच वाढला आहे. वुहान येथील व्हायरोलॉजी प्रयोगशाळेत विविध विषाणू आणि त्यांच्या संसर्गामुळे होणाऱ्या आजारावर संशोधन करण्यात येते. याआधी अनेक संशोधकांनी वुहानच्या प्रयोगशाळेत वटवाघूळ ठेवल्याचा दावा केला आहे. 'चायना अकादमी ऑफ सायन्स'ने मे 2017 मध्ये एक व्हिडीओ प्रसारीत केला होता. या व्हिडीओत वटवाघळांना पिंजऱ्यात ठेवले असल्याचे दिसून आले होते. वुहान प्रयोगशाळेतील नवीन बायोसेफ्टी लेव्हल 4 वरील सुरक्षा सुरू करण्यात आल्यानंतर हा व्हिडिओ जारी करण्यात आला. यामध्ये प्रयोगशाळेत एखादा अपघात झाल्यास सुरक्षा मानके काय आहेत, याची माहिती देण्यात आली होती.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसchinaचीनTwitterट्विटरIndiaभारतNobel Prizeनोबेल पुरस्कार