कोरोनाविरुद्ध लढ्याची जबाबदारी गडकरींकडे द्या : सुब्रमण्यम स्वामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 06:29 IST2021-05-06T06:29:49+5:302021-05-06T06:29:57+5:30

यासंदर्भात सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘प्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटिश साम्राज्यवादानंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण कोरोना महामारीचा सामना करून नक्कीच टिकू

Give the responsibility of fighting against Corona to Gadkari: Subramaniam Swamy | कोरोनाविरुद्ध लढ्याची जबाबदारी गडकरींकडे द्या : सुब्रमण्यम स्वामी

कोरोनाविरुद्ध लढ्याची जबाबदारी गडकरींकडे द्या : सुब्रमण्यम स्वामी

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्रातील मोदी सरकारला अपयश आल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात असताना भाजपचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनीही कोरोनावरून केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. पंतप्रधान कार्यालय हे सध्याच्या कोरोना संकट काळात काहीच कामाचे नसून सध्याची कोरोनाची परिस्थिती हातळण्याची सर्व जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे सहकारी असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

यासंदर्भात सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘प्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटिश साम्राज्यवादानंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण कोरोना महामारीचा सामना करून नक्कीच टिकू. आता आपण योग्य काळजी घेतली नाही, तर मुलांवर परिणाम करणारी आणखी एक लाट आपल्याकडे येईल. त्यामुळे मोदींनी या कोरोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे उपयोगाचे ठरणार नाही.”

हर्षवर्धनना काम मोकळेपणाने करू दिले जात नाही
स्वामी म्हणाले, ‘केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन खूपच नम्र असून, त्यांना त्यांच्या खात्याचे काम मोकळेपणाने करू दिले जात नाही; परंतु, अधिकारवाणीने बोलणाऱ्या नेत्यांसारखे ते नसून खूपच नम्र आहेत. गडकरींसोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल,’ नितीन गडकरीच का? असा प्रश्न एकाने विचारला असता स्वामी म्हणाले, ‘कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी योग्य आरोग्य व्यवस्था उभारणीची गरज लागेल. यामध्ये गडकरींनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध करून दाखविले आहे.”

Web Title: Give the responsibility of fighting against Corona to Gadkari: Subramaniam Swamy