वैद्यकीय कर्मचार्‍यांना मुदतवाढ द्या

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:16+5:302015-02-18T00:13:16+5:30

वैद्यकीय कर्मचार्‍यांना मुदतवाढ द्या

Give extension to medical staff | वैद्यकीय कर्मचार्‍यांना मुदतवाढ द्या

वैद्यकीय कर्मचार्‍यांना मुदतवाढ द्या

द्यकीय कर्मचार्‍यांना मुदतवाढ द्या
आरसीएच उपक्रम: ३३ कर्मचार्‍यांना लाभ
औरंगाबाद : महापालिका हद्दीत प्रजनन बाल आरोग्य सेवा टप्पा-२ साठी (आरसीएच) ३३ कर्मचार्‍यांना ६ महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव २० फेबु्रवारीच्या सभेसमोर ठेवण्यात आला आहे.
वाढती लोकसंख्या, मातामृत्यू, बालमृत्यू आणि एकूण प्रजनन दर कमी करणे हा या आरसीएचचा मुख्य उद्देश आहे. तसेच गर्भवती, बालके, किशोरवयीन मुले, मुली यांच्याकरिता विविध आरोग्य सेवा-सुविधा देण्यासाठी निरनिराळे आरोग्यविषयक कार्यक्रम या उपक्रमातून राबविले जातात. मनपा हद्दीत ५० हजार लोकसंख्येमागे १ आरोग्य केंद्र या प्रमाणे आरसीएच प्रकल्पांतर्गत ९ आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. यामध्ये मनपाच्या ५ आरोग्य केंद्रांची श्रेणी वाढविली आहे, तर ४ नवीन आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ठराविक वेतनावर १ व्यवस्थापक, ५ महिला वैद्यकीय अधिकारी, २२ एएनएम असे ३३ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आले आहेत.

मनपावर वेतनाचा बोजा
मनपाला ३३ कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी दरमहा २ लाख ६५ हजार तर वर्षाला ३१ लाख १८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. मनपा फंडातून हा खर्च होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या अर्थकारणावर त्याचा बोजा पडणार आहे.

Web Title: Give extension to medical staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.