शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

आशीर्वाद असू द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुजराती मतदारांना भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 20:26 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पूर्ण क्षमतेने उतरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गुजराती मतदारांना भावनिक साद घातली. आज एकापाठोपाठ एक केलेल्या ट्विटमधून मोदींनी मतदारांना भाजपाच्या बाजूने मतदान करण्याचे भावनिक आवाहन केले.

नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पूर्ण क्षमतेने उतरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गुजराती मतदारांना भावनिक साद घातली. आज एकापाठोपाठ एक केलेल्या ट्विटमधून मोदींनी मतदारांना भाजपाच्या बाजूने मतदान करण्याचे भावनिक आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदारांना भावनिक साद घालताना म्हणाले, " 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये रेकॉर्डब्रेक मतदान करा, असे आवाहन मी मी गुजरातमधील बंधू भगिनींना करतो. मी आवाहन करतो की, तुम्ही भारतीय जनता पक्षाला बंपर बहुमत देऊन प्रत्येक बुथवर पक्षाला विजय मिळवून द्या."या ट्विटमधून काँग्रेसवर टीका करण्याची संधीही मोदींनी सोडली नाही. त्यांनी काँग्रेसने खोटा प्रचार केल्याचा आरोप केला. आमच्या विरोधी पक्षाने गुजरात, गुजरातचा विकास आणि वैयक्तिक स्तरावर माझ्याविरोधात खोट्या माहितीचा प्रसार केला. अशा प्रकारांची मी कल्पनादेखील केली नव्हती. निश्चितपणे या प्रकारामुळे प्रत्येक गुजराती माणसाला दु:ख झाले आहे. गुजरातमधील जनता निश्चितपणे याला चोख उत्तर देतील. प्रचारादरम्यान मी गुजरातमधील बऱ्याच ठिकाणी फिरलो. यादरम्यान, गुजराती समाजाकडून ज्याप्रकारचं प्रेम गेल्या दोन महिन्यांत मिळाले तसे माझ्या सामाजिक जीवनातील गेल्या 40 वर्षांत मिळालेले नाही. या प्रेमामुळे मला देशाच्या विकासाप्रति आपल्या जीवनाला समर्पित करण्याचे आणि धैर्य आणि प्रोत्साहन मिळाले आहे.  

  विकासाच्या मुद्यावरून घसरून वैयक्तिक टीकाटिप्पणीपर्यंत पोहोचलेला गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार मंगळवारी संध्याकाळी थांबला. गुजरातमधील दुसऱ्या टप्प्याचे मतदान 14 डिसेंबर रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 93 मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून, मतमोजणी 18  डिसेंबरला होणार आहे. 

गुजरातमधील सत्ता कायम राखण्यासाठी सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पणाला लावलेली प्रतिष्ठा, राज्यात दीर्घकाळानंतर सत्तेत पुनरागमन करण्यासाठी काँग्रेसने कसलेली कंबर आणि पटेलांची नाराजी इव्हीएम मशीनमधून व्यक्त होण्यासाठी हार्दिक पटेल यांनी लावलेला जोर यामुळे गुजरात विधानसभेचा प्रचार बऱाचा गाजला. आता हा गुजराती मतदार दुसऱ्या टप्प्यात कुणाच्या पारड्यात आपले मत टाकतो आणि गुजरातमध्ये कुणाचे सरकार बनवतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल.   

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातBJPभाजपा