गर्लफ्रेंडला प्रवासी बनवून टॅक्सीचालक करत होता लुटमार, चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 11:46 IST2017-11-04T11:41:54+5:302017-11-04T11:46:16+5:30
गौतम गर्लफ्रेंड सोनमला सहप्रवासी बनवून गाडीत बसवत असे. त्याचे अन्य साथीदार निशू आणि करण प्रवासी असल्याचे भासवून प्रवाशांना फसवत होते.

गर्लफ्रेंडला प्रवासी बनवून टॅक्सीचालक करत होता लुटमार, चौघांना अटक
लखनऊ - लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना गाडीत बसवून लुटमार करणा-या एका टोळीचा पोलिसांनी पदार्फाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी टॅक्सी चालक त्याची गर्लफ्रेंड आणि दोन साथीदारांना अटक केली आहे. ग्रेटर नोएडामध्ये ही टोळी सक्रीय होती. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गौतम त्यागी त्याची गर्लफ्रेंड सोनम (21), निशू त्यागी (20) आणि करण सिंह (19) प्रवाशांना प्रलोभन दाखवून त्यांची लुटमार करत होते.
गौतम गर्लफ्रेंड सोनमला सहप्रवासी बनवून गाडीत बसवत असे. त्याचे अन्य साथीदार निशू आणि करण प्रवासी असल्याचे भासवून प्रवाशांना फसवत होते. निवृत्त लष्करी अधिका-याच्या पत्नीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. या चौघांनी लष्करी अधिका-याच्या पत्नीकडून 3.5 लाख रुपयाची रोकड आणि सोन्याचे दागिने लुटले.
पोलिसांना आरोपींकडे 1.24 लाख रुपयांची रोकड आणि 60 हजार रुपये किंमतीचे चार मोबाइल फोन सापडले. रेल्वे स्थानकाबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजवरुन पोलिसांना धागेदोरे सापडले. त्यांनी याआधाही चार ते पाच प्रवाशांना पाच ते दहा हजार रुपयांना लुटले होते. पण कोणीही या प्रकरणी तक्रार दाखल केली नव्हती.