जवानाच्या प्रेमाखातर 'ती' सीमेवर पोहोचली; पाकिस्तानी असल्याची अफवा पसरली अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 13:07 IST2021-09-03T13:04:08+5:302021-09-03T13:07:29+5:30

इंडो नेपाळ सीमेवर असलेल्या महाराजगंजमध्ये पोहोचली तरुणी

girl reached maharajganj from delhi in love of ssb sub inspector pakistani | जवानाच्या प्रेमाखातर 'ती' सीमेवर पोहोचली; पाकिस्तानी असल्याची अफवा पसरली अन् मग...

जवानाच्या प्रेमाखातर 'ती' सीमेवर पोहोचली; पाकिस्तानी असल्याची अफवा पसरली अन् मग...

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या महाराजगंजमधील इंडो-नेपाळ सीमेवर तैनात असलेल्या एका एएसआयच्या प्रेमात पडलेली तरुणी दिल्लीहून महाराजगंजला आली. लग्नाचं वचन दिलेला प्रियकर आता टाळाटाळ करत असल्याचा तिचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी एएसआयला चौकशीसाठी बोलावलं. यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणीची पार्श्वभूमी शोधून काढली.

इंडो-नेपाळ सीमेवर तैनात असलेल्या एएसआयला भेटण्यासाठी दिल्लीतील तरुणी महाराजगंजला आली होती. ती पाकिस्तानची असल्याची अफवा परिसरात पसरली. मात्र पोलीस तपासात ती दिल्लीची असल्याची माहिती समोर आली. दिल्लीतील तरुणीची सोशल मीडियाच्या माध्यमातून एएसआयशी ओळख झाली. दोघांमध्ये संवाद सुरू झाला. त्यानंतर मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. 

दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या. त्यानंतर दोघे लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहितीदेखील पुढे आली आहे. काही कालावधीनंतर दोघांमध्ये वाद झाले. एएसआयनं तरुणीशी बोलणं बंद केलं. त्यानंतर प्रेयसी दिल्लीहून महाराजगंजला आली. जवानाशी मैत्री करणारी तरुणी पाकिस्तानी असल्याची अफवा पसरली. गोपनीय माहितीसाठी तिनं जवानाला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची चर्चा परिसरात सुरू झाली. त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली. पोलिसांनी तरुणीची माहिती शोधली. त्यामधून ती दिल्लीची रहिवासी असल्याची माहिती पुढे आली.

Web Title: girl reached maharajganj from delhi in love of ssb sub inspector pakistani