अरेरे! गुपचूप गर्लफ्रेंडला भेटायला आला पण रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी बेदम मारलं अन् लग्नच लावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 17:00 IST2023-06-03T11:48:45+5:302023-06-03T17:00:02+5:30
मुलीचं लग्न अन्य ठिकाणी निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. असं असूनही ती तिच्या प्रियकराला भेटत होती.

फोटो - आजतक
बिहारमधील सारण जिल्ह्यातून एका कपलचं जबरदस्तीने लग्न केल्याची घटना समोर आली आहे. मुलीचं लग्न अन्य ठिकाणी निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. असं असूनही ती तिच्या प्रियकराला भेटत होती. बुधवारी रात्री तिचा प्रियकर तिला भेटण्यासाठी आला असता गावकऱ्यांनी दोघांनाही रंगेहाथ पकडलं. आधी प्रियकराला बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर दोघांनी गावातीलच मंदिरात लग्न केल.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. हे प्रकरण जिल्ह्यातील पारसा ब्लॉकचे आहे. बालीगाव पंचायतीच्या चकसहबाज गावात बुधवारी रात्री उशिरा प्रेयसीला भेटण्यासाठी गुपचूप आलेल्या प्रियकराला ग्रामस्थांनी पकडलं.
प्रियकराला बेदम मारहाण करण्यात आली. मग लग्नासाठी नवीन कपडे आणि लग्नाचे सामान मागवण्यात आले. ग्रामस्थांनी पंचायत घेऊन कोणताही शुभ मुहूर्त न पाहता दोघांचं लगेच लग्न लावून दिलं. पैगा गावातील रहिवासी असलेल्या मनीष कुमारचे चकसहबाज गावातील आरती कुमारीसोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
दोघेही तासनतास मोबाईलवर बोलत असत. मनीष गुपचूप आरतीला भेटायला यायचा. बुधवारी रात्रीही मनीष त्याची गर्लफ्रेंड आरतीला भेटण्यासाठी त्याच्या गावी पोहोचला. तरुण गावात आल्याची माहिती आरतीच्या नातेवाईकांना व ग्रामस्थांना मिळाली. काही दिवसांपासून मनीष आणि आरतीच्या लग्नाबाबत त्यांचे नातेवाईकही बोलत होते, असे गावकऱ्यांनी सांगितले.
पकडल्यानंतर मनीषने बराच वेळ लग्नास नकार दिला. पण, गावकऱ्यांसमोर त्याचं काही चाललं नाही. मनीषच्या नातेवाईकांना लग्नाची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लग्नास नकार दिला. गावकऱ्यांसमोर त्यांचंही काही चाललं नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.