VIDEO: ऑपरेशन टेबलवर तरुणी पठण करत होती हनुमान चालिसा; डॉक्टरांनी केली यशस्वी ब्रेन सर्जरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 19:02 IST2021-07-23T18:56:02+5:302021-07-23T19:02:17+5:30
तरुणी हनुमान चालिसा पठण करत असताना डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया

VIDEO: ऑपरेशन टेबलवर तरुणी पठण करत होती हनुमान चालिसा; डॉक्टरांनी केली यशस्वी ब्रेन सर्जरी
नवी दिल्ली: दिल्लीतल्या अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील न्युरो सर्जरी विभागात एका महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. महिलेला पूर्णपणे बेशुद्ध न करता ब्रेन ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्जरी करताना महिला हनुमान चालिसा पठण करत होती.
मेंदूवर करण्यात येणारी शस्त्रक्रिया अतिशय जटिल मानली जाते. डॉक्टर आणि रुग्णासाठी ही शस्त्रक्रिया अतिशय आव्हानात्मक असते. रुग्णाला कोणताही त्रा होऊ नये, शस्त्रक्रिया केव्हा झाली ते त्याला कळूही नये यासाठी डॉक्टर सतर्क असतात. मात्र दिल्ली एम्समधील न्युरो एनेस्थेटिक टीमनं रुग्णाला बेशुद्ध न करताच त्याच्या मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया करताना महिला पूर्णपणे शुद्धीत होती. इतकंच नव्हे, तर ती ऑपरेशन टेबलवर हनुमान चालीसा पठण करत होती.
दिल्ली एम्समध्ये तरुणीची ब्रेन सर्जरी; शस्त्रक्रिया सुरू असताना तरूण करत होती हनुमान चालिसा पठण https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/I6rYbWZ2bR
— Lokmat (@MiLOKMAT) July 23, 2021
गुरुवारी एम्समध्ये दोन क्रेनियोटॉमी करण्यात आल्या. त्यातील एक २४ वर्षीय शिक्षिकेवर झाली. तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करून मोठा ट्युमर काढण्यात आला. डॉक्टर ट्युमर काढण्यासाठी शस्त्रक्रिया करत होते, त्यावेळी शिक्षिका हनुमान चालिसा पठण करत होती. त्यावेळी ऑपरेशन थिएटरमधील एका व्यक्तीनं शिक्षिकेचा व्हिडीओ चित्रित केला.
शस्त्रक्रिया केल्यानंतर महिलेची स्थिती अतिशय सर्वसामान्य होती. ती हसत हसत ऑपरेशन थिएटरबाहेर पडली. भूलतज्ज्ञ आणि सहाय्यक उपकरणांमुळे डॉक्टरांचं काम काही प्रमाणात सोपं झालं आहे. २००२ पासून न्युरो सर्जरी विभागात क्रेनियोटॉमी (पूर्ण बेशुद्ध न करता केली जाणारी शस्त्रक्रिया) करण्यात येत आहे.