शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

चुक झाली तर कुणीही सुटत नाही गिरीश महाजन : ग्रामसेवकांनी ग्रामविकासात हातभार लावावा

By admin | Updated: July 4, 2016 00:46 IST

जळगाव : केंद्र शासनाने पंचायत राज व्यवस्था सक्षम करण्यासाठी निधीचे वितरण थेट ग्रामपंचायतींना सुरु केले आहे. त्यामुळे गावातील ग्रामसेवक व सरपंच हे गावाचे मालक आहे. निधी येत असताना सतर्क रहा. चुक झाली तर कुणीही सुटत नाही असा सूचक इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला.

जळगाव : केंद्र शासनाने पंचायत राज व्यवस्था सक्षम करण्यासाठी निधीचे वितरण थेट ग्रामपंचायतींना सुरु केले आहे. त्यामुळे गावातील ग्रामसेवक व सरपंच हे गावाचे मालक आहे. निधी येत असताना सतर्क रहा. चुक झाली तर कुणीही सुटत नाही असा सूचक इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला.
रविवारी जिल्हा बँक सभागृहात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचा राज्यस्तरीय मेळावा झाला. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, जि.प.अध्यक्षा प्रयाग कोळी, आमदार गुलाबराव पाटील, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय मस्कर, ग्रामसेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एकनाथराव ढाकणे, जि.प.सदस्य समाधान पवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजन पाटील, मीनल कुटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जबाबदारी वाढली पण जरा सांभाळून
केंद्र शासनाने गावाच्या विकासाठी निधी थेट ग्रामपंचायतींना दिला आहे. त्यामुळे ग्रामसेवकांची जबाबदारी वाढली आहे. मात्र आता माहितीचा अधिकार आहे. वेगळ्या मार्गाने त्याचा अवलंब होत आहे. त्यामुळे सतर्क रहा. लोकप्रतिनिधी किंवा साहेब सांगतात म्हणून कामे करू नका. कारण चुकीला आता माफी नाही असा सूचक इशारा गिरीशमहाजनयांनी दिला.
गाव परिसर आजही अस्वच्छच
ग्रामसेवक, तलाठी आणि शिक्षक यांनी ठरविले तर गावाचे भविष्य बदलवू शकतात. मात्र आजही अनेक गावांमध्ये अस्वच्छता आहे. सर्वत्र उकिरडे, अस्वच्छता आहे. गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही सर्वांचीच असल्याचे त्यांनी सांगितले.

हगणदरी मुक्त गाव प्रमाणपत्रासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरु केले आहे. त्याला यशस्वी करण्याची सर्वाची जबाबदारी आहे. आजही अनेक गावांमध्ये उकिरडे कायम आहेत. सकाळी उघड्यावर शौचालयाला बसलेले असतात. ग्रामीण भागात असे चित्र असताना कार्यकर्ते हे हगणदरी मुक्त गावाचे बीडीओ किंवा सीईओ यांनी पत्र द्यावे त्यासाठी आपल्याकडे आग्रह धरत असतात.

पाणी नाही तर शौचालय बांधायचे कसे?
गेल्या वर्षी दुष्काळीस्थिती होती. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची वाईट अवस्था होती. त्यातच नागरिकांना हगणदरी मुक्त गावासाठी शौचालय बांधण्यास सांगण्याचा प्रयत्न केला असता, पिण्यासाठी पाणी नाही तर स्वच्छतागृहासाठी पाणी कोठून आणावे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो. त्यामुळे आधी पाणी द्या नंतर हगणदरी मुक्त गाव करू असे नागरिकांकडून सांगितले जाते. हा प्रश्न म्हणजे आधी कोंबडी की अंडे असा आहे.