काँग्रेसमध्ये राहुल गांधींशिवाय कोण-कोण घेतं निर्णय...? जाता-जाता हे काय बोलून गेले गुलाम नबी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 16:38 IST2022-08-26T16:36:24+5:302022-08-26T16:38:25+5:30
एकीकडे राहुल गांधी यांच्यावर जोबरदार हल्ला चढवला आहे, तर दुसरीकडे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींपासून ते पक्षाच्या हंगामी अधक्ष सोनिया गांधींपर्यंत गांधी कुटुंबासोबत असलेल्या आपल्या जवळच्या संबंधांचा उल्लेख करत त्यांच्या नेतृत्व क्षमतेचे कौतुक केले आहे.

काँग्रेसमध्ये राहुल गांधींशिवाय कोण-कोण घेतं निर्णय...? जाता-जाता हे काय बोलून गेले गुलाम नबी
काँग्रेसचे दिग्गज नेते गुलामनबी आझातद यांनी आज पक्षाचा राजिनामा दिला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर पाच पानांचा लेटरबॉम्बदेखील टाकला आहे. यात त्यांनी पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला आहे. दशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आजच्या स्थितीसाठी त्यांनी राहुल गांधी यांनाच जबाबदार धरले आहे.
या पक्षात गुलाम नबी आझाद यांनी, एकीकडे राहुल गांधी यांच्यावर जोबरदार हल्ला चढवला आहे, तर दुसरीकडे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींपासून ते पक्षाच्या हंगामी अधक्ष सोनिया गांधींपर्यंत गांधी कुटुंबासोबत असलेल्या आपल्या जवळच्या संबंधांचा उल्लेख करत त्यांच्या नेतृत्व क्षमतेचे कौतुक केले आहे.
2019 नंतर आणखी खराब झाली काँग्रेसची स्थिती -
सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात आझाद म्हणाले, ''2019 च्या निवडणुकीनंतर, काँग्रेसची स्थिती आणखी खराब झाली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा आपमान करण्यापूर्वी कार्यसमितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी घाई घाईत पदाचा राजीनामा दिला आणि आपण (सोनिया गांधी) हंगामी अध्यक्ष पद स्वीकारले.''
राहुल गांधींचे गार्ड आणि पीए घेतात निर्णय -
आझाद यांनी यूपीएचे सरकार हे रिमोटवर चालणारे सरकार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ''वाईट गोष्ट अशी, की यूपीए सरकारची संस्थात्मक अखंडता नष्ट करणारे 'रिमोट कंट्रोल मॉडेल' आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये लागू झाले आहे. आपण केवळ एक नामधारी व्यक्ती आहात. सर्व महत्वाचे निर्णय राहुल गांधी अथवा त्यांचे सुरक्षा गार्ड आणि पीए घेतात.'' काँग्रेस पशाचे हाल असे झाले आहेत, की आता पक्षाचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी स्वतःला पडद्याआड उभे केले जात आहे.