शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

काँग्रेस पक्षश्रेष्ठी अन् असंतुष्ट गटात समेट?; खरगे यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 08:21 IST

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर खरगे यांनी आझाद यांच्याबद्दल ‘सकारात्मक’ मत व्यक्त केल्याने पक्षश्रेष्ठी व असंतुष्ट गटात समेट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये पक्षश्रेष्ठी व असंतुष्ट गटामध्ये समेट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. असंतुष्ट गटाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. यानंतर आज (शनिवार) राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर खरगे यांनी आझाद यांच्याबद्दल ‘सकारात्मक’ मत व्यक्त केल्याने पक्षश्रेष्ठी व असंतुष्ट गटात समेट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल सकारात्मक वक्तव्य दिले. आझाद यांनी काँग्रेससाठी ५० वर्षे दिली आहेत. काँग्रेस मजबूत व्हावी, यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना सर्वांचाच पाठिंबा आहे, असेही खरगे यावेळी म्हणाले. पाच राज्यांमध्ये काँग्रेसच्या खराब कामगिरीसाठी केवळ गांधी कुटुंबीयांवर खापर फाेडणे चुकीचे असल्याचेही खरगे म्हणाले. खरगे यांच्या भेटीनंतर काँग्रेसमधील संवाद अधिक सकारात्मक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये कलह सुरू आहे. पाच राज्यांमध्ये काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्याच्या मागणीला जोर आला आहे. यासंदर्भात असंतुष्ट गटाने सोनिया गांधी यांना पत्र दिले आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीGhulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेस