शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Congress: गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला जबरदस्त धक्का, ५१ नेते देणार राजीनामा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 13:44 IST

Ghulam Nabi Azad: काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणारे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आता काँग्रेसला धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली आहे, आता जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

श्रीनगर - काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणारे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आता काँग्रेसला धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली आहे. आझाद यांच्या राजीनाम्यानंतर, आता जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येथे आझाद यांच्या समर्थनार्थ  काँग्रेसच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मालिका सुरू होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री माजिद वानी, मनोहरलाल शर्मा यांच्यासह काँग्रेसचे ५१ मोठे नेते लवकरच राजीनाम्याची घोषणा करणार आहेत, हे नेते रविवारी आझाद यांच्या नेतृत्वाखालील पक्षात दाखल होणार आहेत.  

काँग्रेसचे जे नेते राजीनामा देणार आहेत. त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री माजिद वानी, जम्मू काश्मीर काँग्रेसचे सरचिटणीस बलवान सिंह,  माजी मंत्री घारू चौधरी, माजी मंत्री मनोहरलाल शर्मा, गुलाम हैदर मलिक, विनोद शर्मा, विनोद मिश्रा, नरिंदर शर्मा, मसूद, परविंदर सिंह, आराधना अंदोत्रा, संतोष मनहास, संतोष मनजोत्रा, वरुण मंगोत्रा, रेहाना अंजुम, रजपौल भारद्वाज, तीरथ सिंह, नीरज चौधरी, सरनाम सिंह, राजदेव सिंह, अशोक भगत, अश्विनी शर्मा, बद्री शर्मा, जगतार सिंह, दलजित सिंह, मदनलाल शर्मा, काली दास, करनेल सिंह, करण सिंह, गोविंद राम शर्मा, रामलाल भगत, केवल कृष्ण, देवेंद्र सिंह बिंदू, कुलभूषण कुमार यांच्यासह एकूण ५१ जण राजीनामा देणार आहेत.

गुलाम नबी आझाद यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचे पत्र लिहून काँग्रेसमधील दोषांवर बोट ठेवले होते. तसेच राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आरोप केले होते.    

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेसPoliticsराजकारण