गाझियाबादच्या इंदिरापुरम परिसरातील शक्तीखंड-२ मध्ये बुधवारी अचानक आग लागली. आग लागली तेव्हा इमारतीत १९ कुटुंब होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. आता इमारतीतील एका रहिवाशाने नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. आग सर्वात आधी त्याच्या घरात लागली आणि त्यानंतर त्याच्या शेजाऱ्याच्या घरात पसरल्याचं म्हटलं.
रहिवासी दीपक त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "माझ्या फ्लॅटला सर्वात आधी आग लागली. एक फटाका माझ्या इन्व्हर्टरवर पडला. जितेंद्र नावाचा माणूस आमच्या इमारतीच्या खाली फटाके फोडत होता. आमच्या इमारतीतील राजीव त्याच्यासोबत फटाके फोडत होता. आरडब्ल्यूएचे अध्यक्ष अशोक त्यागी यांनी त्यांना असे करू नका असे सांगितले, परंतु त्यांनी त्यांच्याशी वाद घातला. शेवटी, येथे आग लागली."
"बाल्कनीतील इन्व्हर्टरपासून आग सुरू झाली. मी अग्निशामक यंत्राने आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग भीषण होती. आग माझ्या घरात आणि नंतर संपूर्ण इमारतीत पसरली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही." प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, दिवाळीच्या रात्री पेटवलेल्या फटाक्यांमुळे इमारतीत आग लागली. आग इतकी भीषण होती की काही क्षणातच संपूर्ण इमारतीत ती पसरली.
घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि खूप प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आग विझवताना कोणतीही मोठी दुर्घटना टाळण्यासाठी जवळपासची घरे रिकामी करण्यात आली. या अपघातात इमारतीच्या फ्लॅटमध्ये साठवलेले घरगुती सामान, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे पूर्णपणे जळून खाक झाली.
Web Summary : A fire in Indirapuram, Ghaziabad, started when a firecracker landed on an inverter, quickly engulfing the building. Nineteen families were safely evacuated. Residents claim fireworks were set off despite warnings.
Web Summary : गाजियाबाद के इंदिरापुरम में पटाखे से इन्वर्टर में आग लगने से इमारत में भीषण आग लग गई। उन्नीस परिवारों को सुरक्षित निकाला गया। निवासियों का दावा है कि चेतावनी के बावजूद पटाखे फोड़े गए।