शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
4
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
5
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
6
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
7
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
8
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
9
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
10
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
11
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
12
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
13
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
14
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
15
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
16
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
17
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
18
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
19
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
20
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं

बिहारमध्ये घमासान... आता तेजस्वी यादवांनीही बाह्या सारल्या; थेट इशाराच दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 9:22 AM

बिहारच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत.

पाटणा - महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा ठळक बातम्यांमध्ये असताना बिहारच्या राजकीय वर्तुळात मोठी घमासान सुरू आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मुख्यमंत्री नितीशकुमार हे भाजपासोबत युतीची घोषणा करू शकतात. त्यामुळे, महाराष्ट्रानंतर आता बिहारच्या राजकीय घडामोडींकडे देशाचे लक्ष लागले आहे. अद्याप यासंदर्भात कुठलेही अधिकृत विधान बड्या नेत्याने केले नाही. मात्र, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या एका विधानाने राजकीय सत्तांतराचं 'वॉर' सुरू असल्याचं दिसून येत आहे. 

बिहारच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार (Nitish Kumar) हे विरोधकांच्या इंडिया आघाडीतून बाहेर पडणार आणि राज्यात पुन्हा भाजपामध्ये सामील होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहेत. मात्र, कुठल्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमताचा आकडा नसल्याने हा सामना अटीतटीचा असल्याचे दिसून येते. त्यातच, पुत्र तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री करण्यासाठी लालू प्रसाद यादव हेही आपली सर्व शक्ती पणाला लावत आहेत. त्यातच, तेजस्वी यादव यांनीही अप्रत्यक्षपणे नितीशकुमारांना इशाराच दिला आहे. सहजरित्या सत्तांतर होऊ देणार नाही, व इतक्या सहजपणे पुन्हा एकदा सत्तेचा मुकूट परिधान करु देणार नाही, असे विधान तेजस्वी यादव यांनी केले आहे. त्यामुळे, बिहारच्या राजकीय भूकंपावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाला आहे. तेजस्वी यादव यांच्या सरकारी बंगल्यावर मध्यरात्री १ वाजता आमदारांची बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले असण्याची शक्यता आहे. आरजेडीकडून दलित चेहऱ्याला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरजेडीचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनाही नितीशकुमार यांनी भेट न दिल्याने त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी आरजेडीलाही अवघ्या काही आमदारांची आवश्यकता आहे. एमआयएम, हम पार्टी यांच्या मदतीने लालू प्रसाद यादव यांनी हा आकडा १२० वर नेला असून त्यांना आता केवळ दोन आमदारांची गरज भासणार आहे. त्यासाठी जेडीयूला फोडण्याचेही लालू प्रसाद यादव प्रयत्न करत असल्याची चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

ममता बॅनर्जी यांनीही दिली प्रतिक्रिया

७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवनात एका कार्यक्रमादरम्यान ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, "मला वाटते की नितीश कुमार यांनी बिहारच्या लोकांच्या नजरेत आपली विश्वासार्हता गमावली आहे. त्यांनी राजीनामा दिल्यास तेजस्वी यादव यांना बिहारमध्ये सुरळीतपणे काम करणे सोपे होईल." अलीकडेच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवेल, असे जाहीर केले होते. तसेच, प्रादेशिक पक्ष एकत्र राहतील आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरच भविष्यातील सर्व निर्णय घेतले जातील, असे त्या म्हणाल्या होत्या.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादवBJPभाजपा