शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 06:32 IST

Rahul Gandhi vs Narendra Modi: पाच वर्षांपासून उपस्थित करत असलेल्या अंबानी-अदानी या मुद्यावर काँग्रेसच्या शहजाद्याने बोलायचे बंद केले आहे. यामागचे कारण काँग्रेसने जनतेला सांगितले पाहिजे. शहजाद्याने हा मुद्दा उपस्थित न करण्यासाठी काही ‘डील’ केले नाही ना? असे मोदी म्हणाले होते.

- हरिश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कहैदराबाद : पाच वर्षांपासून उपस्थित करत असलेल्या अंबानी-अदानी या मुद्यावर काँग्रेसच्या शहजाद्याने बोलायचे बंद केले आहे. यामागचे कारण काँग्रेसने जनतेला सांगितले पाहिजे. शहजाद्याने हा मुद्दा उपस्थित न करण्यासाठी काही ‘डील’ केले नाही ना? असा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विचारला. तेलंगणा येथील वेमुलावाडा येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते म्हणाले की, अदानी-अंबानी यांच्याविरोधात करण्यात येणारा प्रचार काँग्रेसकडे नोटांनी भरलेला टेम्पो पोहोचल्यामुळे त्या पक्षाने बंद केला की काय? निवडणुका जाहीर झाल्यापासून अंबानी-अदानी यांच्यावर टीका करणे काँग्रेसने थांबवले आहे. अदानी-अंबानींकडून नेमके काय मिळाले हे काँग्रेसच्या शहजाद्याने तेलंगणाच्या भूमीवरून जाहीर करावे, असे आव्हानही पंतप्रधानांनी  दिले. याला राहुल गांधी यांनी चोख प्रत्यूत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेस पक्षाने अदानी-अंबानी यांच्यावर टीका केली होती आणि आता एका रात्रीत ही टीका थांबली. याचा अर्थ काँग्रेस पक्षाला बहुतेक काही टेम्पो भरून ‘चोरी का माल’ मिळाला आहे. काले धन की कितनी बाेरीया भरकर रुपये मारे है असा सवालही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केला.

‘काँग्रेस, बीआरएसचे घराणेशाहीला प्राधान्य’पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, काँग्रेस, भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हे दोन पक्ष घराणेशाहीला महत्त्व देतात. हे दोन पक्ष भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून परस्परांवर टीका करतात. पण दोन्ही पक्षच भ्रष्टाचारी आहेत.

‘काँग्रेस, इंडिया आघाडीचा तिसरा फ्यूजही उडाला’nलोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यानंतर झालेल्या या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तिसऱ्या टप्प्यातील मतदानाने काँग्रेस व इंडिया आघाडीचा तिसरा फ्यूजही उडाला आहे. nआता या निवडणुकांचे चार टप्पे शिल्लक असून, त्यामध्ये जनतेचे आशीर्वाद भाजपप्रणित एनडीए आघाडीला मिळणार आहेत. आमचा विजय निश्चित आहे.

आम्हाला पैसे दिले का, सीबीआय, ईडी चौकशी करानवी दिल्ली : अदानी, अंबानी यांनी काँग्रेसला टेम्पो भरून पैसे पाठविले असावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे असेल तर त्यांनी सीबीआय, ईडीमार्फत चौकशी करावी, असे आव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी दिले. राहुल गांधी म्हणाले, उद्योगपती पैसे पाठवितात या वैयक्तिक अनुभवावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केले असावे. मोदी यांनी या दोन उद्योगपतींना जे पैसे दिले आहेत, ती रक्कम आम्ही जनतेला योजनांच्या माध्यमातून परत देणार आहोत. भाजपच्या भ्रष्टाचाराच्या टेम्पोचे चालक व सहाय्यक कोण आहेत याची देशाला माहिती आहे. यावेळी प्रथमच तुम्ही जाहीरपणे दोघांबद्दल बोलला. हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? असा सवालही राहुल यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४