अस्सल भारतीय! केवळ 7777 रुपयांचा धासू स्मार्टफोन आला, चिनी कंपन्यांना बाय बोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 05:41 PM2020-08-04T17:41:25+5:302020-08-04T17:41:53+5:30

चीनसोबतच्या वादामुळे चिनी कंपन्यांच्या स्मार्टफोनची मागणी घटलेली असताना आता या वाहत्या वाऱ्यांमध्ये भारतीय तसेच चीनबाहेरच्या कंपन्या फायदा करून घेणार आहेत.

Genuine Indian! LAVA launch smartphone for only Rs 7777, say bye to China | अस्सल भारतीय! केवळ 7777 रुपयांचा धासू स्मार्टफोन आला, चिनी कंपन्यांना बाय बोला

अस्सल भारतीय! केवळ 7777 रुपयांचा धासू स्मार्टफोन आला, चिनी कंपन्यांना बाय बोला

Next

चीनसोबतच्या वादामुळे चिनी कंपन्यांच्या स्मार्टफोनची मागणी घटलेली असताना आता या वाहत्या वाऱ्यांमध्ये भारतीय तसेच चीनबाहेरच्या कंपन्या फायदा करून घेणार आहेत. काही वर्षांपूर्वी चर्चेत असलेली भारतीय कंपनी Lava ने मंगळवारी नवा हँडसेट लाँच केला. Lava Z66 हा स्मार्टफोन कंपनीने 10 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत लाँच केला आहे.

 
लावाच्या या हँडसेटची बॅटरी 3950 एमएएच आहे. तर 6.08 इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच स्क्रीनवर वाटरड्रॉप स्टाइल नॉच देण्यात आला आहे. लावाच्या या झेड66 ची किंमत 7777 रुपये आहे. हा फोन मरीन ब्ल्यू, बेबी रेड आणि मिडनाईट ब्ल्यू रंगामध्ये उपलब्ध आहे. मेड इन इंडिया असलेला हा स्मार्टफोन सर्व ऑफलाईन रिटेल स्टोअरवर खरेदी करता येणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार हा हँडसेट लवकरच ईकॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध केला जाणार आहे. 


लावाचा हा फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो. यामध्ये 2.5 डी कर्व्हड 6.08 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. याचा अस्पेक्ट रेशो 19:9 आहे. फोनमध्ये एक नॉच कट आऊट आहे त्यामध्ये सेल्फी कॅमेरा आहे. यामध्ये 1.6 गीगहर्ट्ज़ ऑक्टा-कोर प्रोसेसर, 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. हे स्टोरेज 128 जीबी पर्यंत वाढविता येणार आहे. 


याफोनमध्ये 3950mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार हा फोन 16 तास चालू शकतो. हा फोन अँड्रॉईड 10 वर आधारित आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉकसारखे फिचर आहेत. फोटोग्राफीसाठी लावा फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. लावा झेड 66 मध्ये एलईडी फ्लॅशसोबत 13 मेगापिक्सलचा आणि 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. रिअर कॅमेरामध्ये ब्यूटी मोड, नाइट मोड, एचडीआर मोड, बर्स्ट मोड, पॅनोरमा, टाइम-लॅप्स आणि स्लो-मोशन मोड्स देण्यात आले आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

शाओमीचा स्वस्तातला Redmi 9A स्मार्टफोन येणार; 6000 पेक्षा कमी किंमत असणार

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा मुलगा IAS बनला; वाचा प्रदीप सिंह यांची संघर्षमय कहानी

UPSC IAS, IPS परीक्षेचा निकाल जाहीर; प्रदीप सिंह देशभरात टॉपर

यंदा LIC चा आयपीओ मालामाल करणार; या कंपन्या करणार शेअर बाजारात एन्ट्री

सुशांतच्या खात्यातून 17 नाही, 50 कोटी काढले; बिहारच्या डीजीपींचा मुंबई पोलिसांवर आरोप

RBI Recruitment: फक्त एक इंटरव्ह्यू; रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी

Web Title: Genuine Indian! LAVA launch smartphone for only Rs 7777, say bye to China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.